
2017 ला झालेल्या पुणे महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला मोठं यश मिळालं होतं. तब्बल 97 जागा भाजपला मिळाल्या, भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला तर राष्ट्रवादी काँग्रेसने या महापालिकेत 39 जागा जिंकल्या होत्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महापालिकेत दुसऱ्या क्रमांकावर होता. प्रभाग क्रमांक 27 मध्ये कोंढवा खूर्द आणि मिठा नगर या भागाचा समावेश होतो. या प्रभागात गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं यश मिळालं होतं, तीन वार्डात राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले होते. तर एका वार्डात मनसेच्या उमेदवारानं बाजी मारली. प्रभाग क्रमांक 28 मध्ये सॅलेबरी पार्क आणि महर्षी नगर या भागाचा समावेश होतो. प्रभाग क्रमांक 27 मध्ये खातंही न उघडणाऱ्या भाजपला प्रभाग क्रमांक 28 मध्ये मात्र दणदणीत यश मिळालं होतं. प्रभाग क्रमांक 28 च्या चारही वार्डात भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. मात्र यावेळी काही राजकीय समीकरणं बदलली आहेत, त्यामुळे यावेळी निकाल कसा असणार? याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
प्रभाग क्रमांक 27 – प्रभाग क्रमांक 27 मध्ये कोंढवा खूर्द आणि मिठा नगर या भागाचा समावेश होतो. पुणे महापालिकेत गेल्यावेळी भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता, मात्र या प्रभागातील एकही जागा भाजपला जिंकता आली नाही, या प्रभागातील तीन वार्डात राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा विजय झाला तर एक जागा मनसेला मिळाली, प्रभाग क्रमांक 27 अ मधून राष्ट्रवादीचे उमेदवार हाजी पठाण हे विजयी झाले होते. तर ब मधून परवीण फिरोज यांचा विजय झाला. तर प्रभाग क्रमांक 27 क मधून राष्ट्रवादीच्याच उमेदवार हमिदा सुंडके यांचा विजय झाला, तर ड मधून मनसेचे उमेदवार साईनाथ बाबर यांचा विजय झाला.
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
प्रभाग क्रमांक 28 – प्रभाग क्रमांक 28 मध्ये मात्र भाजपाला मोठं यश मिळालं, प्रभाग क्रमांक 28 च्या चारही वार्डात भाजपचा दणदणीत विजय झाला. प्रभाग्र क्रमांक 28 मध्ये सॅलेबरी पार्क आणि महर्षी नगर या भागाचा समावेश होतो. प्रभाग क्रमांक 28 अ मधून भाजपच्या उमेदवार कविता वैरागे यांचा विजय झाला, तर प्रभाग क्रमांक 28 ब मधून भाजपचे उमेदवार श्रीनाथ भिमाले यांचा विजय झाला. प्रभाग क्रमांक 28 क मधून भाजपच्या उमेदवार राजश्री शिलमकर यांचा विजय झाला, तर ड मधून भाजपचे उमेदवार प्रवीण चोरबेले हे विजयी झाले.
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE