Pune Election Results 2026 LIVE : पुण्याच्या प्रभाग क्रमांक 17, 18 मध्ये भाजप, राष्ट्रवादीत काटे की टक्कर, कोण मारणार बाजी?

Pune Election Results 2026 LIVE : पुण्याच्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये गेल्यावेळी चौरंगी लढत पहायला मिळाली. या प्रभागामध्ये गेल्यावेळी दोन वार्डात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले तर एका वार्डात भाजप आणि एका वार्डात शिवसेनेच्या उमेदवारानं विजयाचा गुलाल उधळला. तर प्रभाग क्रमांक 18 मध्ये भाजपाचा दबदबा दिसून आला, चारही वार्डात भाजपाचे उमेदवार विजयी झाले.

Pune Election Results 2026 LIVE : पुण्याच्या प्रभाग क्रमांक 17, 18 मध्ये भाजप, राष्ट्रवादीत काटे की टक्कर, कोण मारणार बाजी?
pune Election Results 2026
| Edited By: | Updated on: Jan 16, 2026 | 12:48 AM

2017 मध्ये झालेल्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजपनं जोरदार मुसंडी मारली होती, पुण्यामध्ये एकूण 41 प्रभाग असून, 172 जागा आहेत. त्यापैकी भाजपानं तब्बल 97 जागांवर विजय मिळवला होता, भाजप हा पुणे महापालिका निवडणुकीतील सर्वात मोठा पक्ष ठरला होता, तर राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमाकांवर होता. राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे महापालिकेत 39 जागा मिळाल्या. दरम्यान पुणे महापालिकेत जरी भाजपला चांगलं यश मिळालं असलं तरी देखील प्रभाग क्रमांक 17 मध्ये मात्र राष्ट्रवादीचाच दबदबा पहायला मिळाला. पुणे महापालिकेच्या प्रभाग 17 मध्ये रास्ता पेठ, रविवार पेठ या भागाचा समावेश होतो, या प्रभागात दोन वार्डामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले होते, तर एका प्रभागात भाजपचा उमेदवार विजयी झाला तर एक जागा शिवसेनेला मिळाली, दरम्यान प्रभाग क्रमांक 18 मध्ये मात्र याच्या उलट परिस्थिती होती. प्रभाग क्रमांक 18 मध्ये चारही वार्डात भाजपचेच उमेदवार विजयी झाले. प्रभाग क्रमांक 18 मध्ये खडकमाळी आळी आणि महात्मा फुले पेठ या भागाचा समावेश होतो.

प्रभाग क्रमांक 17 – पुण्याच्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये रास्ता पेठ, रविवार पेठ या भागाचा समावेश होतो. प्रभाग क्रमांक 17 मध्ये गेल्यावेळी राष्ट्रवादीला चांगलं यश मिळालं होतं, दोन जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय झाला होता. तर एक जागा शिवसेनेला आणि एक जागा भाजपला मिळाली होती. पुण्याच्या प्रभाग क्रमांक 17 अ मधून राष्ट्रवादीच्या उमेदवार लक्ष्मी आंदेकर या विजयी झाल्या होत्या, तर ब मधून भाजपच्या उमेदवार सुलोचना कोंढारे या विजयी झाल्या होत्या. क मधून राष्ट्रवादीचे उमेदवार वनराज आंदेकर हे विजयी झाले होते. तर ड मधून शिवसेनेचे उमेदवार विशाल धनवडे हे विजयी झाले होते.

Live

Municipal Election 2026

10:58 PM

सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर

09:12 PM

जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही

08:00 PM

BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?

06:58 PM

एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का

11:39 PM

ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा

11:00 PM

राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज

प्रभाग क्रमांक 18 – पुण्याच्या प्रभाग क्रमांक 18 मध्ये खडकमाळी आळी आणि महात्मा फुले पेठ या भागाचा समावेश होतो.या प्रभागामध्ये भाजपचा दबदबा दिसून आला, या प्रभागाच्या चारही वार्डात भाजपच्याच उमेदवारांचा विजय झाला. प्रभाग क्रमांक 18 अ मधून विजया लक्ष्मी हरीहर यांचा विजय झाला. तर ब मधून भाजपच्याच उमेदवार आरती कोंढारे या विजयी झाल्या होत्या, क मधून भाजपाचे उमेदवार अजय खेडेकर हे विजयी झाले. तर ड मधून भाजपचे उमेदवार समर्थ थोरात यांनी बाजी मारली.

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

पुणे महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE