Pune Election Results 2026 LIVE : पुण्याच्या प्रभाग क्रमांक 25, 26 मध्ये तिरंगी लढत, यावेळी कोण मारणार बाजी?

Pune Election Results 2026 LIVE: पुण्याच्या प्रभाग क्रमांक 25 आणि 26 मध्ये तिरंगी लढत पहायला मिळत आहे. गेल्यावेळी दोन्ही प्रभागातील आठ वार्डपैकी तीन वार्डात भाजपचा विजय झाला, तीन वार्डात राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला तर दोन जागा या शिवसेनेला मिळाल्या होत्या.

Pune Election Results 2026 LIVE : पुण्याच्या प्रभाग क्रमांक 25, 26 मध्ये तिरंगी लढत, यावेळी कोण मारणार बाजी?
pune Election Results 2026
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 16, 2026 | 2:14 PM

2017 मध्ये पुणे महापालिकेत भाजपला मोठं यश मिळालं होतं, असे अनेक प्रभाग होते, की ज्या प्रभागाच्या चारही वार्डात भाजपचा विजय झाला होता, मात्र प्रभाग क्रमांक 25 आणि 26 मध्ये परिस्थिती थोडी वेगळी होती. प्रभाग क्रमांक 25 आणि 26 मध्ये तिरंगी लढत पहायला मिळाली. प्रभाग क्रमांक 25 मध्ये वानवाडी भागाचा समावेश होतो. या प्रभागामध्ये दोन जागा या भाजपाला तर दोन जागा या राष्ट्रवादीला मिळाल्या होत्या. तर प्रभाग क्रमांक 26 मध्ये मोहमदवाडी, कौसर बाग या भागाचा समावेश होतो, या प्रभागात दोन जागा शिवसेनेला आणि प्रत्येकी एक जागा भाजप व राष्ट्रवादीला मिळाली होती. गेल्यावेळी या प्रभाग तिरंगी लढत होती, त्यामुळे यंदा काय होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

प्रभाग क्रमांक 25 – प्रभाग क्रमांक 25 मध्ये वानवाडी भागाचा समावेश होतो, गेल्यावेळी या प्रभागात दोन जागा भाजपला तर दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या होत्या. प्रभाग क्रमांक 25 अ मधून भाजपाचे उमेदवार धनराज घोगरे हे विजयी झाले होते. तर ब मधून भाजपच्या उमेदवार कालिंदी पुंडे या विजयी झाल्या, तर क मध्ये मात्र राष्ट्रवादीच्या उमेदवार रत्नप्रभा जगताप यांचा विजय झाला. तर ड मधून प्रशांत जगताप यांचा विजय झाला होता.

पुणे महापालिका निवडणूक निकाल लाईव्ह

प्रभाग क्रमांक 26- प्रभाग क्रमांक 26 मध्ये मोहमदवाडी, कौसर बाग या भागाचा समावेश होतो, गेल्या निवडणुकीत या प्रभागात दोन जागा या शिवसेनेला मिळाल्या होत्या, तर एक जागा भाजपला आणि एक जागा राष्ट्रवादीला मिळाली होती. प्रभाग क्रमांक 26 अ मधून शिवसेनेच्या उमेदवार प्राची अल्हट या विजयी झाल्या होत्या, तर ब मधून शिवसेनेचेच उमेदवार प्रमोद भांगरे यांनी बाजी मारली होती. तर क मधून राष्ट्रवादीच्या उमेदवार नंदा लोणकर या विजयी झाल्या, ड मधून भाजपचे उमेदवार संजय घुले हे विजयी झाले. दरम्यान गेल्यावेळी या प्रभागात तिरंगी लढत पहायला मिळाली होती, त्यामुळे यावेळी कोण बाजी मारणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

पुणे महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

Follow Us