AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातील 3 मोठी शहरं, 4 महत्वाच्या बातम्या

राज्यातील 3 मोठ्या शहरांमधील 4 महत्वाच्या बातम्या आपण याठिकाणी वाचू शकणार आहात. त्यात नागपूर, पुणे आणि औरंगाबाद शहरातील बातम्यांचा समावेश आहे.

राज्यातील 3 मोठी शहरं, 4 महत्वाच्या बातम्या
| Edited By: | Updated on: Jan 15, 2021 | 7:52 PM
Share

मुंबई: राज्यातील 3 मोठ्या शहरांमधील 4 महत्वाच्या बातम्या आपण याठिकाणी वाचू शकणार आहात. त्यात नागपूर, पुणे आणि औरंगाबाद शहरातील बातम्यांचा समावेश आहे. (3 big cities and 4 important news)

पुणे :

कोरोना काळात रुग्णालयांकडून निर्माण झालेल्या कचऱ्यांवरुन आता महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये वाद सुरु झाला आहे. कोरोना काळात रुग्णालयांमध्ये तयार झालेल्या कचऱ्यासाठी पालिकेनं किलोमागे 100 रुपयांचे अतिरिक्त शुल्क आकारण्याचं ठरवलं आहे. महापालिकेच्या या अतिरिक्त शुल्काला खासगी रुग्णालयांनी विरोध दर्शवला आहे. दवाखान्यांपासून ते रुग्णालयांपर्यंत निर्माण होणारा जैववैद्यकीय कचरा संकलनाचे काम महापालिकेनं पास्को कंपनीला दिलं आहे. बहुतांश रुग्णालयांना कंपनीने मार्च ते ऑक्टोबरपर्यंतची एकत्रित बिले दिल्यानं विरोध वाढला आहे. कुठलीही चर्चा न करता अतिरिक्त शुल्क लावल्याचा आरोप रुग्णालय असोसिएशन ऑफ पुणेच्या सचिव मंजूषा कुलकर्णी यांनी केलाय.

नागपूर :

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी राज्यातील आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सर्वच पक्षांनी लावली आहे. नागपूर महापालिका निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केली आहे. काँग्रेसनं सन्मानजनक जागा दिल्या नाहीत तर सर्व जागा लढवण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी ही निवडणूक लढणार आहे. त्यासंदर्भात अनिल देशमुख आणि प्रफुल्ल पटेल यांनी प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीही सुरु केल्या आहेत. सोमवारी देशमुख आणि पटेल यांनी सहा विधानसभा मतदारसंघाच्या प्रमुखांशी चर्चा केली आहे.

औरंगाबाद :

कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर आता परदेशातून औरंगाबादेत येणाऱ्या प्रत्येकाला 7 दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. या प्रवाशांना कुठलीही लक्षणं नसली तरीही त्यांना क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आलं आहे. परदेशातून आलेल्या सर्व प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट केली जाणार आहे. टेस्ट रिपोर्ट निगेटीव्ह आला तरीही त्यांना क्वारंटाईन केलं जाणार आहे. औरंगाबाद शहर आणि जिल्हा प्रशासनाने हा कडक निर्णय घेतला आहे.

दरम्यान, औरंगाबादमध्ये कोरोना लसीकरणाची तयारी पूर्णत्वाकडे आहे. पहिल्या टप्प्यात 12 हजार 307 जणांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. त्यासाठी केंद्र आणि स्वयंसेवकांची तयारीही झाली आहे. लसीकरणासाठी या स्वयंसेवकांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे. फ्रंटलाईन वर्कर्सना तातडीने लस दिली जाणार आहे. नव्या वर्षात लसीकरण सुरु होण्याची चिन्ह आहेत.

पुणे :

कोरोनाचा धोका आणि नववर्षाच्या स्वागतासाठी होणारी गर्दी लक्षात घेता पुणे शहरात 5 हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रात्री 11 ते सकाळी 6 यावेळेत जमावबंदी आदेश लागू असेल. डेक्कन, जंगली महाराज रोड, महात्मा गांधी रोड या भागात नववर्षाच्या स्वागतासाठी तरुण वर्ग आणि पुणेकर मोठी गर्दी करतात. त्यामुळे या भागात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. रात्री 11 पूर्वीच उपहारगृहे आणि दारुची दुकानं बंद करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. तशी माहिती पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या:

पुणे महापालिका निवडणुकीत भाजप-आरपीआयचे 100 हून अधिक नगरसेवक निवडून आणणार : खा. बापट

काय आहे महाविकास आघाडीचं मिशन ग्रामपंचायत; वडेट्टीवारांनी सांगितला प्लॅन

3 big cities and 4 important news

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.