हिंजवडीतली सोसायटी बनली शेकडो पक्ष्यांचं घर, पक्ष्यांसाठी ज्वारी-बाजरीची शेती, फळांचीही लागवड

लॉकडाऊनच्या झळा ज्याप्रमाणे माणसांना बसल्या तशाच त्या मुक्या जनावरांना आणि पक्ष्यांनाही बसल्या. हिंजवडी परिसरातल्या लाईफ रिपब्लिक टाऊनशिपमधल्या (Life Republic Township) रहिवाशांनी पक्षांसाठी एक अभिनव उपक्रम राबवला आहे. ज्यामुळे शेकडो पक्ष्यांना हक्काचं घरटं मिळालं आहे.

हिंजवडीतली सोसायटी बनली शेकडो पक्ष्यांचं घर, पक्ष्यांसाठी ज्वारी-बाजरीची शेती, फळांचीही लागवड
Follow us
| Updated on: Aug 28, 2021 | 7:12 PM

पिंपरी : कोरोना (Corona) विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षी लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात आला. त्यामुळे संपूर्ण देश घरात बंदिस्त झाला. लॉकडाऊन लागल्याने रस्ते ओस पडले, फूटपाथवर राहणाऱ्या लोकांचे हाल झाले. अनेकांवर उपासमारीची वेळ आली.

लॉकडाऊनच्या झळा ज्याप्रमाणे माणसांना बसल्या तशाच त्या मुक्या जनावरांना आणि पक्ष्यांनाही बसल्या. कित्येक जनावरं आणि पक्षी आपली भूक भागवण्यासाठी वणवण फिरत होती. अशावेळी हिंजवडी (Hinjawadi) परिसरातल्या लाईफ रिपब्लिक टाऊनशिपमधल्या (Life Republic Township) रहिवाशांनी पक्षांसाठी एक अभिनव उपक्रम राबवला आहे. ज्यामुळे शेकडो पक्ष्यांना हक्काचं घरटं मिळालं आहे. (A Housing society has set up artificial nests for birds to feed them in Hinjawadi)

लॉकडाऊनमध्ये सुरू केला उपक्रम

लॉकडाऊनकाळात सर्वजण आपापल्या घरात रहावं लागलं होतं. अशावेळी पक्ष्यांची उपासमार होत होती. याकाळात अनेक पक्षी अन्नाच्या शोधात शहरी वस्तीकडे आले. हिंजवडीत असलेल्या लाईफ रिपब्लिक टाऊनशिपमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी सुरूवातीला या पक्ष्यांना अन्न देण्यास सुरूवात केली. बघता-बघता टाऊनशिप परिसरात पक्ष्यांची संख्या वाढत गेली.

पक्ष्यांसाठी लावली 180 कृत्रिम घरटी

पक्ष्यांची रोज वाढत जाणारी संख्या पाहून टाऊनशिपमधल्या रहिवाशांनी त्यांच्यासाठी कायमस्वरूपी घरट्यांची सोय करण्याचं ठरवलं. यातून टाऊनशीप परिसरातल्या मोकळ्या जागेत तब्बल 180 कृत्रिम घरटी लावण्यात आली आहेत. यामध्ये पक्ष्यांसाठी रोज कडधान्य ठेवलं जातं. अन्नाच्या शोधात असलेले कित्येक पक्षी आता या टाऊनशिपमध्ये येऊन आपली भूक भागवतात. ही कृत्रिम घरटीच पक्षांचं घर बनलं आहे.

पक्ष्यांसाठी ज्वारी-बाजरीची शेती, फळांची लागवड

आता हिंजवडीच्या लाईफ रिपब्लिक टाऊनशीपमध्ये रोज वेगवेगळ्या पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो. टाऊनशीपमधल्या कृत्रिम घरट्यांमध्ये अनेक प्रकारचे देशी-विदेशी पक्षी येत आहेत. पक्षांची वाढती संख्या पाहून इथल्या रहिवाशांनी त्यांच्यासाठी ज्वारी-बाजरीची शेती सुरू केली आहे.

सोबतच काही फळांची लागवडही केली आहे. त्यामुळे पक्ष्यांना शहरी वस्तीतही अगदी निसर्गाचा आनंद घेता येत आहे. या उपक्रमामुळे सोसायटीतल्या चिमुकल्यांवरही पर्यावरण संवर्धनाचे आणि भूतदयेचे संस्कार होत आहेत.

(A Housing society has set up artificial nests for birds to feed them in Hinjawadi)

इतर बातम्या :

उपयुक्त साधन घेण्यासाठी दिव्यांगांना अर्थसहाय्य, पिंपरी चिंचवड महापालिकेची योजना, वाचा सविस्तर

Video : विरोधक म्हणतात हे सरकार तीन चाकी रिक्षा, अजित पवारांनी चक्क इलेक्ट्रीक रिक्षाच चालवून बघितली!

PMRDA विकास आराखड्यावर हरकती नोंदवण्यासाठी अखेर मुदतवाढ! आता या तारखेपर्यंत नोंदवा हरकती

Non Stop LIVE Update
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.