आता कळलं असेल की कसं लोक विरोधकांचं डिपॉझिट जप्त करतात, अजितदादांची जोरदार फटकेबाजी!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये विविध विकासकामांचं भूमीपूजन केलं. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली.

आता कळलं असेल की कसं लोक विरोधकांचं डिपॉझिट जप्त करतात, अजितदादांची जोरदार फटकेबाजी!
Follow us
| Updated on: Jan 31, 2021 | 9:26 PM

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये विविध विकासकामांचं भूमीपूजन केलं. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली. अजित पवार यांनी त्यांच्याविरोधात विधानसभा निवडणुकीत उभे असलेल्या भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्यासह जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांना चांगलेच टोले लगावले. जेव्हा आमचा कार्यक्रम झाला तेव्हा विरोधकांचं डिपॉझिट जप्त कसं होतं हे लोकांना कळाल्याचंत अजित पवार म्हणाले (Ajit Pawar criticize Gopichand Padalkar and Ramesh Thorat in Baramati).

दौंडच्या पराभवावरुन अजित पवार यांनी माजी आमदार आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरातांचे जोरदार चिमटे काढले. अजित पवार म्हणाले, “आज (31 जानेवारी) जिल्हा बँकेच्या शाखेचं सकाळी साडेसात वाजता उदघाटन केलं. बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश थोरात यांना वाटलं कोण इतक्या सकाळी येतय? जेव्हा कार्यक्रम झाला तेव्हा त्यांना कळलं की कसं लोक विरोधकाचं डिपॉझिट जप्त करतात. त्यासाठी सकाळी लवकर उठून काम करावं लागतं. तुम्हीही असं काम केलं असतं, तर आता आमदार झाला असता.”

‘… जर असं दिसलं तर माझा ताफा थांबवून थेट पोलिसांच्या ताब्यात देणार’

“रस्त्याच्या विरुद्ध बाजूने गाडी चालवू नका. आपल्याला कुणी रॉन्ग साईडने येताना दिसलं तर मी त्याला माझा ताफा थांबवून परत पाठवतो. आता जर असं दिसलं तर थेट पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. बारामतीत कोणतेही अवैध व्यवसाय चालू देणार नाही. मी खपवून घेणार नाही. कोरोनाचे सावट असले तरी कामे थांबलेली नाहीत. ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कामे होताहेत,” असंही अजित पवार म्हणाले.

‘पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे पाहत अजितदादांनी हशा पिकवला’

अजित पवार यांनी बारामतीवर बोलताना थेट घरगुती विषयाला हात घालत सभेत चांगलाच हशा पिकवला. ते म्हणाले, “बारामती शहरात बंद पाईपलाईनद्वारे गॅस घरपोच दिला जाणार आहे. त्याचं काम सध्या प्रगतीपथावर आहे. त्यामुळं आता तुमच्या बायकोनं गॅस आणा म्हटलं, तर तुम्ही सांगू शकता गप्प बस. घरात गॅस पाईपने येतोय. तुम्ही तसं म्हणू शकता, पण मला तसं बोलता येत नाही. मला सोसावंच लागतं.”

हेही वाचा :

‘मला सोसावंच लागतं’, अजितदादांची सुनेत्राताईंकडे नजर आणि उपस्थितांमध्ये एकच हशा!

वीजबिल भरा, अन्यथा महावितरण कंपनी अडचणीत येईल, अजित पवारांचे शेतकऱ्यांना आवाहन 

नाहीतर ठेकेदाराला बघून घेतो, उपमुख्यमंत्री अजितदादांनी भरला दम!

व्हिडीओ पाहा :

Ajit Pawar criticize Gopichand Padalkar and Ramesh Thorat in Baramati

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.