AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Narendra Modi: मोदींच्या देहू दौऱ्यातले असे दोन मोठे क्षण जेव्हा अजित पवारांमुळे ते एकदम ठळक झाले, दोन्ही वेळेस काय घडलं?

PM Narendra Modi: यावेळी अजित पवार यांनी मोदींना हातजोडून अभिवादन केलं. मोदींनीही अजितदादांच्या अभिवादनाचा हातजोडून स्वीकार केला. त्यानंतर मोदींनी अजितदादांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांची विचारपूस केली.

PM Narendra Modi: मोदींच्या देहू दौऱ्यातले असे दोन मोठे क्षण जेव्हा अजित पवारांमुळे ते एकदम ठळक झाले, दोन्ही वेळेस काय घडलं?
मोदींच्या देहू दौऱ्यातले असे दोन मोठे क्षण जेव्हा अजित पवारांमुळे ते एकदम ठळक झाले, दोन्ही वेळेस काय घडलं? Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 14, 2022 | 3:58 PM
Share

देहू : पंतप्रधान नरेंद्र मोदी  (pm narendra modi) आज जगदगुरु संत तुकाराम महाराज मंदिर (शिळा मंदिर) लोकार्पण सोहळ्यासाठी देहूत आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते शिळा मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी झालेल्या वैष्णव सभेला संबोधित केलं. यावेळी एका पुस्तकाचंही मोदींच्या हस्ते प्रकाशन करण्यात  आलं. मोदींच्या या दौऱ्यावेळी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) उपस्थित होते. सोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते. मोदींनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. संत तुकारामांची थोरवी गातानाच तुकारामांचे अभंग आजही प्रासंगिक असल्याचं सांगितलं. तुकारामांच्या अभंगात जीवनाचं सार सामावलेलं असल्याचंही त्यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केलं. आजच्या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण पंतप्रधान नरेंद्र मोदीच होते. पण आज घडलेल्या दोन प्रसंगामुळे अजित पवारही चांगलेच चर्चेत राहिले.

एअरपोर्टवर मोदींचं स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज वायुसेनेच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोदींचं स्वागत केलं. त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, चंद्रकांत पाटील, लेफ्टनंट जनरल जे.एस.नैन, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, वायुसेनेच्या पुणे विभागाचे प्रमुख एच. असुदानी आदी उपस्थित होते. मोदी यांचं स्वागत करायला राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार सर्वात पुढे उभे होते. यावेळी अजित पवार यांनी मोदींना हातजोडून अभिवादन केलं. मोदींनीही अजितदादांच्या अभिवादनाचा हातजोडून स्वीकार केला. त्यानंतर मोदींनी अजितदादांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांची विचारपूस केली. दोन तीन मिनिटं हे दोन नेते विमानतळावर बोलत होते. त्यामुळे अजितदादा आणि मोदी यांच्या नेमकी काय चर्चा सुरू आहे? अशी चर्चा सुरू झाली. त्यामुळे अजित पवार चर्चेत आले.

भाषणाची संधीच नाही, पुन्हा चर्चा

आणखी एका दुसऱ्या प्रसंगाने अजित पवार मोदींच्या दौऱ्यात चर्चेत आले. शिळा मंदिराचं लोकार्पण केल्यानंतर मोदींसहीत सर्व मान्यवर सभा मंडपात आले. यावेळी स्टेजवर अजित पवार मोदींच्या बाजूलाच बसले होते. दुसऱ्या बाजूला फडणवीस बसले होते. त्यानंतर भाषणाचा कार्यक्रम सुरू झाला. यावेळी सर्वात पहिलं भाषण देवेंद्र फडणवीस यांनी केलं. फडणवीसांनी आपल्या भाषणात अजित पवारांचा उल्लेख केला. फडणवीसांच्या भाषणानंतर मोदींच्या हस्ते एका पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. त्यानंतर सूत्रसंचालकाने भाषणासाठी मोदींचं नाव पुकारलं. तेव्हा अजित पवार यांचं भाषण राहिल्याचं मोदींनी सूत्रसंचालकांच्या लक्षात आणून दिलं. मोदींनी सूत्रसंचालकांकडे पाहून इशारा केला. मात्र, अजित पवार यांनी तुम्ही भाषण करा, असं सांगितलं आणि मोदी भाषणाला उठले. मोदींनीही आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच अजित पवारांचा उल्लेख केला. पण राज्याचे उपमुख्यमंत्री असूनही अजित पवार यांना भाषण करण्याची संधी न दिल्याने त्याची चर्चा सुरू होती.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.