अण्णा हजारेंचा केंद्र सरकारला अल्टीमेटम, शेतकऱ्यांच्या प्रश्नी शेवटचं उपोषण करण्याचा इशारा

30 जानेवारीला शेतकऱ्यांच्या प्रश्नी शेवटच उपोषण करणार असल्याचा इशारा अण्णा हजारेंनी दिला. (Anna Hajare Fast Agitation)

अण्णा हजारेंचा केंद्र सरकारला अल्टीमेटम, शेतकऱ्यांच्या प्रश्नी शेवटचं उपोषण करण्याचा इशारा
अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 1:45 PM

अहमदनगर : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीत गेल्या दीड महिन्यांहून अधिक काळ शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा देत 30 जानेवारीला उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे. दिल्लीतील रामलीला मैदानात उपोषणाला परवानगी न दिल्यास जिथे जागा मिळेल तिथे उपोषण करु, असा इशारा अण्णा हजारेंनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अण्णा हजारेंनी पत्र लिहीलेल्या पत्रांना केंद्र सरकारकडून उत्तर दिलं गेलं नसल्याची माहिती देण्यात आली आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा अण्णा हजारे यांनी यापूर्वीच दिला होता. (Anna Hajare said he will going on Fast Agitation on 30 January for Farmers issue )

30 जानेवारीला उपोषण

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी यापूर्वी केंद्र सरकारला दिलेल्या इशाऱ्या नुसार 30 जानेवारी म्हणजेच महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनी दिल्लीत उपोषण करणार आहेत. केंद्र सरकारनं रामलीला मैदानात उपोषणाला परवानगी द्यावी, अशी मागणी अण्णा हजारेंनी केली आहे. शेतकरी आंदोलनाविषयी 5 पत्र लिहून देखील सरकारकडून उत्तर आलं नसल्याचा दावा अण्णांनी केला आहे. सरकारनं दिलेले आश्वासन 30 जानेवारीपर्यंत पूर्ण न केल्यास अण्णा हजारे शेतकऱ्यांच्या प्रश्नी शेवटचं उपोषण करणार आहेत.

सरकार पोकळ आश्वासनं देतं त्यांच्यावर विश्वास नाही

अहमदनगरमधील राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकारांशी बोलत असताना केंद्र सरकारला आंदोलनाचा इशारा दिला होता. अण्णा यावेळी म्हणाले होते की, “शेतकऱ्यांसाठी गेल्या तीन वर्षांपासून आंदोलन करत आहे, परंतु सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणतीही ठोस पावलं उचलली नाहीत. हे सरकार केवळ पोकळ आश्वासनं देत आहे. त्यामुळे माझा त्यांच्यावर बिलकुल विश्वास नाही”.

अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे, खासदार भागवत कराड आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी राळेगणसिद्धी येथे येऊन अण्णा हजारे यांची भेट घेतली. अण्णांसोबत चर्चा करून एक महिन्याची मुदत मागून अण्णांनी आंदोलन करू नये अशी विनंती देखील त्यांनी केली होती. मात्र, आता अण्णांनी अश्वासनांवर विश्वास न ठेवता शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास जानेवारी महिन्याच्या शेवटी आयुष्यातील शेवटचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आता केंद्र सरकार याबाबत काय भूमिका घेतंय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सर्व ताज्या बातम्यांचे अपडेट्स, पाहा गुड मॉर्निंग महाराष्ट्र, दररोज सकाळी 7 वा. @TV9Marathi वर

संबंधित बातम्या:

‘संकटमोचक’ गिरीश महाजन अण्णांच्या भेटीला, शेतकरी आंदोलनात न उतरण्यासाठी भाजपची डिप्लोमसी?

भाजपला अण्णांची भीती?, बागडे राळेगणसिद्धीत; दीड तास खलबतं

(Anna Hajare said he will going on Fast Agitation on 30 January for Farmers issue )

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.