AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi visit maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देहूतल्या कार्यक्रमाला जायचंय? पोलीस उपायुक्तांनी काय म्हटलं? इथे वाचा…

पाण्याच्या बाटल्या, बॅगा या सभाठिकाणी आणण्यास प्रतिबंध आहे. दीड तासाचा साधारणपणे कार्यक्रम असणार आहे. त्यासाठी जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे पिंपरी चिंचवड पोलीस प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

PM Modi visit maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देहूतल्या कार्यक्रमाला जायचंय? पोलीस उपायुक्तांनी काय म्हटलं? इथे वाचा...
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानिमित्त देहूला आलेले पोलीस छावणीचे स्वरूपImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jun 13, 2022 | 1:02 PM
Share

देहू, पुणे : संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचा (Sant Tukaram Maharaj shila mandir) लोकार्पण सोहळा उद्या पार पडणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांतर्फे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासाठी 10 पोलीस उपायुक्त, 10 सहायक पोलीस आयुक्त, 100 पोलीस निरीक्षक, 300 पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, 2000 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देहूत काही तासांमध्ये दाखल होतायेत, त्यांच्या हस्ते शिळा मंदिर, जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा पार पडणार पडल्यानंतर ते वारकऱ्यांना (Warkaris) संबोधित करणार आहेत. तेथील तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

कार्यक्रमस्थळी कसे पोहोचावे?

याविषयी पोलीस उपायुक्त आनंद भोईटे म्हणाले, की पार्किंग आणि येण्या-जाण्याचा मार्ग हा महत्त्वाचा आहे. जुन्या हायवेवरून पूर्णपणे नो-एन्ट्री करण्यात आली आहे. तो मार्ग केवळ व्हीआयपी वाहनांसाठीच राहील. ज्यांना कार्यक्रमासाठी यायचे आहे, त्यांनी तळवडे या मार्गे यावे. देहूगावामधील मार्ग हे खासगी वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत. तळवडेवरून आल्यानंतर याठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पार्किंग केल्यानंतर बसने सभाठिकाणचा जो पॉइंट आहे, त्याठिकाणी सोडले जाईल.

‘पाण्याच्या बाटल्या, बॅगा आणू नयेत’

पाण्याच्या बाटल्या, बॅगा या सभाठिकाणी आणण्यास प्रतिबंध आहे. दीड तासाचा साधारणपणे कार्यक्रम असणार आहे. त्यासाठी जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे पिंपरी चिंचवड पोलीस प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. कोणताही अनुचित प्रकार होणार नाही, याची खबरदारी पोलिसांतर्फे घेण्यात येत आहे. एकूणच देहूनगरीला सध्या पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

संपूर्ण कार्यक्रम असा असणार

– मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देहूत आगमन होईल.

– त्यानंतर श्री संत तुकाराम महाराज मंदिराबाहेर वारकऱ्यांकडून स्वागत

– मंदिरात आगमन, विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन, ध्वजपूजन, श्रीराम दर्शन, महादेव दर्शन,

– पश्चिम दिशेच्या पान दरवाजातून इंद्रायणी नदीसह भंडारा, घोरवडी व भामचंद्र डोंगराचे दर्शन,

– शिळा मंदिरात श्री संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीला अभिषेक व पूजा,

– मंदिर कोनशिला अनावरण, अभंग गाथा दर्शन विश्वस्त समितीकडून सत्कार

– सभास्थळाकडे मार्गस्थ, सभास्थळी व्यासपीठावर आगमन, स्वागत सत्कार, मंदिराचे लोकार्पण (बटन दाबून), प्रमुख पाहुण्यांचे भाषण, पंतप्रधानांचे भाषण, समारोप

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.