Pune crime | बंगाली बाबाचा कारनामा ; दारूचे व्यसन सोडवण्याच्या नावाखाली 96 हजारांना लावला चुना

Pune crime | बंगाली बाबाचा कारनामा ; दारूचे व्यसन सोडवण्याच्या नावाखाली 96 हजारांना लावला चुना
दारूचे व्यसन सोडवण्यासाठी बंगाली तांत्रिकची मदत
Image Credit source: TV9 Marathi

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2 मार्चला पीडित यांना प्रभाकर कौदरे यांना पंचायत समिती समोर उभे असताना मिया बंगाली साबरी अशा नावाचे कार्ड फिर्यादीच्या हातात देऊन गेला. या कार्डवरील नंबरवरून पीडित प्रभाकर यांनी संपर्क साधला. त्यानंतर बंगाली बाबाला माझ्या मुलाला दारूचे व्यसन आहे.

प्राजक्ता ढेकळे

|

Mar 17, 2022 | 3:20 PM

पुणे – राजगुरूनगर(Rajgurunagar) येथे मुलाची दारू व्यसन सोडवणे (Alcoholism)चांगलेच महागात पडले आहे. मुलाचे दारूचे व्यसन सोडवण्यासाठी बंगाली तांत्रिकची मदत घेतली.  त्यानंतर पीडितांच्या मजबुरीचा फायदा घेत तुमच्या मुलाची दारू सोडवण्यासाती मी जालीम उपाय करू शकतो. मात्र त्यासाठी तुम्हाला 96  हजार रुपये द्यावे लागतील. आपल्या मुलाचं दारूचे व्यसन सुटू शकते या आशेपोटी त्यांनी बंगाली मांत्रिकाला 96 हजार देण्याचे काबुल केलं. मात्र  बंगाली बाबाने पीडित व्यक्तीकडून 96  हजार रुपये घेऊन पोबारा केला आहे याप्रकरणी प्रभाकर भिकाजी कौदरे (वय65 राजगुरू) यांनी खेड पोलिसात तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी(Police) अज्ञात बंगाली बाबाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

अशी घडली घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2  मार्चला पीडित यांना प्रभाकर कौदरे यांना पंचायत समिती समोर उभे असताना मिया बंगाली साबरी अशा नावाचे कार्ड फिर्यादीच्या हातात देऊन गेला. या कार्डवरील नंबरवरून पीडित प्रभाकर यांनी संपर्क साधला. त्यानंतर बंगाली बाबाला माझ्या मुलाला दारूचे व्यसन आहे हे सोडवण्यासाठी तुम्ही मदत करा व माझ्या मुलाची दारू सोडवा अशी मदत मागितली. त्यानंतर पीडितांच्या मजबुरीचा फायदा घेत तुमच्या मुलाची दारू सोडवण्यासाती मी जालीम उपाय करू शकतो. मात्र त्यासाठी तुम्हाला 96  हजार रुपये द्यावे लागतील. आपल्या मुलाचं दारूचे व्यसन सुटू शकते या आशेपोटी त्यांनी बंगाली मांत्रिकाला 96  हजार देण्याचे काबुल केलं.

सवणूक झाल्याचे समोर आले

त्यानंतर बंगाली मांत्रिकाने तुमचा मुलगा 21 दिवसात दारू सोडे असे सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून प्रभाकर व त्यांच्या पत्नीने मांत्रिकाला तब्बल 96 हजार दिले आहेत. पैसे दिल्यानंतरही मुलाच्या व्यसनांमध्ये कोणत्याही फरक दिसून आला नाही. या उलट मुलगा जास्तच दारू पिताना दिसून आला. त्यानंतर पुन्हा 15  मार्चला प्रभाकर त्यांच्या पत्नीसह मांत्रिकाला भेटण्यासाठी गेले . मात्र तिथे मांत्रिक आढळून आला नाही. तिथे चौकशी केली असता, तो बंगाली मांत्रिक इथून कधीच निघून गेला असे परिसरतील लोकांनी सांगितले. त्यानतंर आपली फसवणूक झाल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली.

Success Story : बिगर मोसमात कलिंगड लागवडीचे धाडस केले, व्यापारी थेट शेतकऱ्याच्या बांधावर आले

VIDEO : परीक्षा केंद्रांवर Copy आढळल्याने Nanded मधील 7 शाळांना शिक्षण विभागाची नोटीस

पत्र देण्यासाठी गेली अन् हरिणांनी रोखला मार्ग, मेलवाहकास आला मजेशीर अनुभव; पाहा Video

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें