AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपमध्ये अस्वस्थता नाही, नाथाभाऊंनी तिकडे गेल्यावर तरी खरं बोलावं; चंद्रकांत पाटलांचा टोला

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये अस्वस्थता असल्याचा दावा केला होता. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे. (bjp leader chandrakant patil refuses unrest in bjp)

भाजपमध्ये अस्वस्थता नाही, नाथाभाऊंनी तिकडे गेल्यावर तरी खरं बोलावं; चंद्रकांत पाटलांचा टोला
chandrakant patil
| Edited By: | Updated on: Jun 07, 2021 | 1:07 PM
Share

पुणे: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये अस्वस्थता असल्याचा दावा केला होता. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे. नाथाभाऊ आमचे नेते आहेत. त्यांनी तिकडे गेल्यावर तरी खरं बोलावं, असा टोला लगावतानाच भाजपमध्ये अस्वस्थता नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. (bjp leader chandrakant patil refuses unrest in bjp)

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन हा टोला लगावला आहे. नाथाभाऊ आमचे नेते आहेत. तिकडे गेल्यावर तरी त्यांनी खरं बोलावं. दीड वर्षात त्यांनी एकही आंदोलन केलं नाही. आम्ही अनेक आंदोलने केली. पंढरपूरही जिंकलो, असं सांगतानाच आम्हाला फसवलं गेलं याचं आम्हाला दु:खं आहे. आमच्याशी धोका झाला. पण भाजपमध्ये कोणत्याही प्रकारची अस्वस्थता नाही, असं पाटील म्हणाले.

राऊतांना टोला

यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांनाही टोला लगावला. संजय राऊतांच नाव घेऊन माझा दिवस का बिघडवता? असा सवाल करतानाच राऊतांनी 80 जागा लढवणार असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी 80 नव्हे 280 जागा लढवाव्यात. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असा चिमटा त्यांनी काढला.

सरकारमध्ये एकवाक्यता नाही

यावेळी त्यांनी अनलॉकच्या मुद्द्यावरून आघाडी सरकारवर टीका केली. वारंवार टीकेचा स्वभावही नाही अन मुद्दाही नाही. पण ठाकरे सरकारमध्ये कोणत्याही गोष्टीवर एकवाक्यता नाही. प्रत्येकाला प्रेस समोर येण्याची घाई झाली आहे, असं ते म्हणाले.

आधी 10 रुपये कमी करा, मग केंद्राकडे मागणी करा

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने आंदोलन सुरू केलं आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. अजित पवार काय किंवा उद्धव ठाकरे काय, त्यांना प्रत्येक गोष्ट केंद्राने करावी असे वाटते. राज्याने आधी 10 रुपये टॅक्स कमी करावा, मग केंद्राने 5 रुपये कमी करण्याची मागणी करावी, असा सल्ला त्यांनी आघाडी सरकारला दिला.

पक्ष सोडल्यावर मारण्याची पद्धत नाही

भाजपमध्ये मतभेद नाहीत आणि असतील तरी ते सोडवण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, असं सांगतानाच आमच्यामध्ये पक्ष सोडल्यावर मारण्याची पद्धत नाही. जोही पक्ष सोडून जाईल तो आहे तिथे सुखी रहा, अशी आमची पद्धत आहे, असं त्यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना सांगितलं. (bjp leader chandrakant patil refuses unrest in bjp)

संबंधित बातम्या:

देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून अस्वस्थ, सरकार स्थापन करायला तळमळताहेत; खडसेंची टीका

एक दिवस देवेंद्र फडणवीस मातोश्रीवरही येतील: संजय राऊत

संजय राऊतांची अवस्था ना घरका ना घाटका; देवेंद्र फडणवीसांची टीका

(bjp leader chandrakant patil refuses unrest in bjp)

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.