AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात भाजमध्ये अंतर्गत धुसफूस? आमदाराची भर मंचावरुन जाहीरपणे नाराजी व्यक्त

पुण्यात भाजप आमदाराने भर मंचावरुन आपली जाहीर नाराजी व्यक्त केलीय. आपल्याला बोलू दिलं जात नाही, असा आरोपच त्यांनी केलाय.

पुण्यात भाजमध्ये अंतर्गत धुसफूस? आमदाराची भर मंचावरुन जाहीरपणे नाराजी व्यक्त
देवेंद्र फडणवीस Image Credit source: tv9
| Updated on: Jan 10, 2023 | 10:44 PM
Share

अभिजीत पोटे, Tv9 मराठी, पुणे : भाजप आमदार भीमराव तापकीर (Bhimrao Tapkir) यांची मंचावरून जाहीर नाराजी व्यक्त केलीय. आपल्याला कोणत्याही कार्यक्रमात बोलू दिलं जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केलीय. शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी आज कुठेतरी बोलू दिलं, असं म्हणत त्यांनी उपरोधिक टोला लगावलाय. पुण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर लिखीत पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. भाजप पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या संकल्पनेतून ‘धडाकेबाज लोकनेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन पार पडलं. यावेळी आमदारांनी नाराजी व्यक्त केली.

शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी मला आज बोलण्याची संधी दिली. कोणी नाही म्हणून कोणालातरी बोलायला उभं केलं पाहिजे म्हणून मला उभं केलं. आणि मी पण समजून गेलो, चला आता कोणी नाही तर मी आहे कुठं तरी बोललं पाहिजे म्हणून आपली सुरवात केली, असं आमदार भीमराव तापकीर म्हणाले

“मी बोलेन तोपर्यंत कोणीतरी नेता येईल आणि पुढे बोलेल मी त्या अनुषंगानेच बोलत होते. मला नेमका बाहेर आवाज आला आणि कळलं आता आपण आपलं भाषण आवरतं घ्यावं”, असं तापकीर म्हणाले.

“कारण आता प्रत्येक नेता येऊन बोलणार आहे. खरंतर आज मी अध्यक्ष जगदीश मुळीक यांचे आभार मानतो कारण कधी तरी तुम्ही मला बोलायला संधी दिली . कारण काय होत प्रत्येक कार्यक्रमात मी पाठीमागे कुठेतरी बसलेलो असतो”, अशी खंत तापकीर यांनी व्यक्त केली.

मेधा ताई तुम्ही माझ्याकडे असं पाहू नका. मी खरं तेच बोलतोय. मला आज संधी फक्त एव्हढ्याकरिता दिली की आज कोणीही नेते स्टेजवर उपस्थित नाहीत, आमदार भीमराव तापकीर म्हणाले.

यावेळी भाजप नेते चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाषण केलं. देवेंद्र फडणवीस यांना कधीच त्यांनी बोललेली गोष्ट मागे घ्यावी लागली नाही. पुण्यात त्यांच्या बोलण्यावर आक्षेप घ्यायची कुणाची हिंमत झाली नाही. कारण त्यांचे भाषण अभ्यासपूर्वक असतं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“सचिन वाझेच्या प्रकरणात देखील बोलताना त्यांनी मला सांगितलं की दादा देखते रहो आज मैं क्या बोलता हुँ. उद्धव ठाकरेंना सचिन वाझेला निलंबित करावं लागलं”, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

“आधी दोन भोंगे वाजायचे, सकाळी संजय राऊत आणि संध्याकाळी नवाब मलिक. देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यास करून त्यांचे सगळे जुने शोधून काढल्याने ठरवलं की यांना जेलमध्येच पाठवायचं आहे. महाराष्ट्रमध्ये माझ्या एवढा धुरंदर नाही, असं वाटणाऱ्या लोकांना देवेंद्र पुरून उरले”, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना लगावला.

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.