AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आजही सांगते थोबाड फोडून टाकेन’, चित्रा वाघ कडाडल्या, रुपाली चाकणकर यांनाही घेतलं आरोपीच्या पिंजऱ्यात

"आजही सांगते थोबाड फोडून टाकेन", अशा शब्दांत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अभिनेत्री उर्फी जावेद हिला पुन्हा एकदा इशारा दिलाय.

'आजही सांगते थोबाड फोडून टाकेन', चित्रा वाघ कडाडल्या, रुपाली चाकणकर यांनाही घेतलं आरोपीच्या पिंजऱ्यात
Image Credit source: tv9
| Updated on: Jan 07, 2023 | 6:57 PM
Share

प्रदीप कापसे, टीव्ही 9 मराठी, पुणे : “आजही सांगते थोबाड फोडून टाकेन”, अशा शब्दांत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अभिनेत्री उर्फी जावेद हिला पुन्हा एकदा इशारा दिलाय. चित्रा वाघ यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी साडीचोळी देवून आंदोलन करणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी “त्यासाठी समोरचीपण लायकीची लागते, साडीचोळी हे सात्विकतेचं प्रतीक आहे”, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

चित्रा वाघ यांनी यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही निशाणा साधला. “मी पक्षाचे अध्यक्ष होते तेव्हा त्या शहराध्यक्ष होत्या. आणि मैत्रीण ती काय एकटी नाही. माझ्या अनेक मैत्रिणी आहेत. आणि मी मैत्रीणीसारखंच ट्रीट केलं. वितुष्ट येण्याचं काही कारण नाही. कसला आकस? माझ्या मैत्रीला तुम्ही पुण्यावाल्यानं जास्त गोंजारलं”, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

“रुपाली चाकणकर यांनी महिलांचा आदर आणि सन्मान राखण्यासाठी महिला आयोग स्थापन झालंय याचा उल्लेख केला याचा आनंद वाटला. पण समाधान तेव्हा वाटेल जेव्हा खऱ्या अर्थाने महिलांना त्याठिकाणी दिलासा मिळेल आणि आम्ही त्यावेळेला नक्कीच सादर करेन”, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

‘एकीला जाब विचारायचा आणि दुसरीला गोंजरायचं’

“आता संदर्भ दोन वेगवेगळ्या प्रकारणांचा कसा काय? कारण दोन्ही प्रकरणांमध्ये महिलाच आहेत. अंगप्रदर्शनावर आक्षेप आहेत. मग एकीला जाब विचारायचा आणि दुसरीला गोंजरायचं. हे कसंकाय? त्यामुळे एका प्रकरणात दोन वेगवेगळे संदर्भ असूच शकत नाहीत”, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

“मला एक नक्की सांगायचं आहे. आक्षेप हा या संस्थेला नाहीच. माझा आक्षेप आहे की, ज्या पद्धतीने या प्रकरणात जी अंमलबजावणी केली गेली त्या संस्थेच्या अध्यक्षांच्या कार्यप्रणालीवर आक्षेप आहे. त्या कार्यपद्धतीमुळे न्यायाची परिभाषा कोणती? हा प्रश्न उपस्थित होतोय. तिथे काय करतात याची माहिती मला आहे”, असंदेखील वाघ म्हणाल्या.

“ज्या पद्धतीने आयोगावर आक्षेप असं बोललं जातंय. अरे पण तुम्ही म्हणजे आयोग नाही. एकटी अध्यक्ष म्हणजे आयोग नसते. आयोग म्हणजे अध्यक्ष आणि त्यासोबत असणारे सदस्य, तसेच महाराष्ट्र पोलीस महासंचालक हे सुद्धा या आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतात. एकटी मी म्हणजे आयोग असं डोक्यात असेल तर ते काढायला पाहिजे”, अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी सुनावलं.

‘अशा 56 नोटीस रोज येतात’

“मला अशा 56 नोटीस रोज येत असतात. त्यात आणखी एकीची भर पडली”, असं प्रत्युत्तर चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटीसला दिलं.

“मला जी नोटीस पाठवली आहे, ती सगळ्या सदस्यांच्या बहुमताने मंजूर करुन पाठवली आहे का? आयोगाचे जे पद्सिद्ध सदस्य आहेत, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांची संमती घेतलीय का? तुम्ही म्हणजे आयोग नव्हे. माहिती घ्या. सदस्य, पोलीस महासंचालक हे मिळून आयोग होतो”, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

“मुंबई पोलीस आयुक्तांनी दखल घेतली नाही हेही सांगितलं गेलं. कशाच्या आधारावर? जे वक्तव्य केलं गेलं की, मुंबई पोलीस आयुक्तांनीदेखील दखल घेतली नाही ते कशाच्या अधिकारावर बोलले? खुलासा मागवला का? म्हणजे आयोगाच्या अध्यक्षांना खुलासा करण्याचा अधिकार आहे. मागवला असेल तर स्पष्ट करा. फोनवर बोलणं झालं तर स्पष्ट करा”, असं आवाहन वाघ यांनी केला.

“एवढ्या मोठ्या संस्थेच्या अध्यक्षपदी बसल्यावर ही असली बाष्कळ विधानं, तुमची तर घालवतातच, ज्या पक्षातून आलात त्याचीही घालवतात. सर्वात महत्त्वाचं आम्हाला ते दोन्ही आम्हाला महत्त्वाची नाहीत. आम्हाला महत्त्वाचा आहे तो आयोग. बाष्कळ विधानं बंद केली पाहिजे”, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.