AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Election Result 2023 | आपल्या गावातच दिलीप वळसे यांना धक्का, परळीत पंकजा मुंडे पेक्षा धनंजय मुंडे वरचढ

Pune and Beed Gram Panchayat Election 2023 Result | राज्यातील ग्रामपंचायतींचा निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत प्रस्थापितांना धक्के बसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते दिलीप वळसे पाटील यांना गावातच धक्का बसला आहे. परळीत पंकजा मुंडे यांच्यासाठी धक्कादायक निकाल समोर आला आहे.

Maharashtra Election Result 2023 | आपल्या गावातच दिलीप वळसे यांना धक्का, परळीत पंकजा मुंडे पेक्षा धनंजय मुंडे वरचढ
dilip walse patil dhananjay munde pankaja mundeImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 06, 2023 | 1:55 PM

सुनिल थिगळे, आंबेगाव, पुणे, संभाजी मुंडे, परळी, बीड | 6 नोव्हेंबर 2023 : राज्यातील २ हजार ३६९ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले. या ठिकाणी मतमोजणी सुरु झाली आहे. त्यात अनेक प्रस्थापितांना धक्के बसले आहेत. अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांना त्यांच्या गावात धक्का बसला आहे. या ठिकाणी शिंदे गटाचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. त्याचवेळी परळीमध्ये पंकजा मुंडे यांना धनंजय मुंडे यांनी जोर का झटका दिला. यापूर्वी तालुक्यातील तीन ग्रामपंचायत पंकजा मुंडे यांच्या ताब्यात होत्या. त्यापैकी दोन ग्रामपंचायत धनंजय मुंडे यांना मिळाल्या. पंकजा मुंडे यांना केवळ एका ग्रामपंचायतीवर विजय मिळवता आला.

आंबेगावात दिलीप वळसे यांना धक्का

राज्याचे सहकारमंत्री आणि अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने त्यांच्याच गावात धक्का दिला आहे. निरगुडसर गावात झालेल्या चुरशीच्या झालेल्या लढतीत शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले आहे. सरपंचपदासाठी शिंदे गटाचे रवी वळसे 135 मतांनी विजयी झाले आहे. पुणे जिल्हयात अनेक ठिकाणी अजित पवार गटाचे उमेदवार विजयी होत आहे. परंतु आंबेगावात त्यांच्या गटाला पराभव पत्करावा लागला. निरगुडसर गावात शिंदे गटाचे सरपंच रवी वळसे पाटील विजयी झाले. या ठिकाणी एकूण 13 पैकीं 3 सदस्य शिंदे गटाचे तर 10 सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय झाले. रवी वळसे यांना 1483 तर राष्ट्रवादीचे संतोष टाव्हारे यांना 1348 मते मिळाली.

परळीमध्ये पंकजा मुंडे यांना धक्का

परळी तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. तालुक्यातील एकूण तीन ग्रामपंचायतींपैकी धनंजय मुंडे यांनी दोन ग्रामपंचायतीवर यश मिळवले. तसेच पंकजा मुंडे यांना एका ग्रामपंचायतीत वर्चस्व मिळवता आले. यापूर्वी या तिन्ही ग्रामपंचायती पंकजा मुंडे यांच्या ताब्यात वैजनाथ तालुक्यातील हिवरा, सोनहिवरा आणि वाणटाकळी तांडा या ग्रामपंचायतीवर पंकजा मुंडे यांचे वर्चस्व होते. परंतु आता त्यांच्यकजे एक ग्रामपंचायत राहिली आहे.

हे सुद्धा वाचा

मतमोजणीसाठी नऊ फेऱ्या

परळी तालुक्यातील मतमोजणीसाठी एकूण 9 फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडली. तालुक्यातील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या एकूण 26 जागासांठी मतमोजणी झाली. आजच्या निकालातून हिवरा व वाणटाकळी तांडा या दोन ग्रामपंचायती धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेल्या आहेत. उर्वरित सोनहिवरा या एका ग्रामपंचायतीत वर्चस्व कायम राखण्यात पंकजा मुंडे यांना यश मिळाले आहे.

गोवंडीत डंपरनं चिरडून तिघांचा जागीच मृत्यू, संतप्त जमावाकडून ठिय्या
गोवंडीत डंपरनं चिरडून तिघांचा जागीच मृत्यू, संतप्त जमावाकडून ठिय्या.
6 व्या दिवशी उपोषण सोडलं, बच्चू कडूंना सरकारकडून आश्वासनांचं पत्र
6 व्या दिवशी उपोषण सोडलं, बच्चू कडूंना सरकारकडून आश्वासनांचं पत्र.
मेडे, मेडे... पायलटचा असा होता शेवटचा मेसेज, Mayday म्हणजे नेमकं काय?
मेडे, मेडे... पायलटचा असा होता शेवटचा मेसेज, Mayday म्हणजे नेमकं काय?.
..अन् दुर्घटनेचा LIVE व्हिडिओ बनला, शूट करणाऱ्याच्या मित्रानं सांगितलं
..अन् दुर्घटनेचा LIVE व्हिडिओ बनला, शूट करणाऱ्याच्या मित्रानं सांगितलं.
इस्त्रायल-इराण संघर्ष पेटला, जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर?
इस्त्रायल-इराण संघर्ष पेटला, जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर?.
बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन स्थगित; जर सरकारनं विश्वास घात केला तर..
बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन स्थगित; जर सरकारनं विश्वास घात केला तर...
सामंत ठरले सरकारचे नवे संकटमोचक, पत्र देताच बच्चू कडूंचा मोठा निर्णय
सामंत ठरले सरकारचे नवे संकटमोचक, पत्र देताच बच्चू कडूंचा मोठा निर्णय.
VIDEO : बच्चू कडूंच्या आंदोलकांनंतर पुणे पोलिसांची मीडियावर अरेरावी
VIDEO : बच्चू कडूंच्या आंदोलकांनंतर पुणे पोलिसांची मीडियावर अरेरावी.
पुण्यात दादांचं भाषण सुरू अन् 'प्रहार'च्या कार्यकर्त्यानी घातला गदारोळ
पुण्यात दादांचं भाषण सुरू अन् 'प्रहार'च्या कार्यकर्त्यानी घातला गदारोळ.
पुढील 24 तास धोक्याचे... या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, IMDचा अलर्ट काय?
पुढील 24 तास धोक्याचे... या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, IMDचा अलर्ट काय?.