Pune : पाण्यात पडलेल्या पाच जणांना अग्निशामक दलानं वाचवलं, कारसह एसएम जोशी पुलाखाली कोसळलं होतं पालघरमधलं कुटुंब

अग्निशमन दलाच्या जवानांनी नदीत उड्या टाकत प्रवेश केला आणि दोरी, लाइफ जॅकेट आणि इतर उपकरणे वापरून कुटुंबातील सदस्यांची सुटका केली. हे कुटुंब मूळचे पालघर जिल्ह्यातील असून ते नातेवाईकांना भेटण्यासाठी पुण्याला आले होते.

Pune : पाण्यात पडलेल्या पाच जणांना अग्निशामक दलानं वाचवलं, कारसह एसएम जोशी पुलाखाली कोसळलं होतं पालघरमधलं कुटुंब
नदीत अडकलेल्यांना अग्निशामक दलानं वाचवलंImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 12:49 PM

पुणे : एसएम जोशी पुलाखाली (S M Joshi bridge) नदीत पडलेल्या कारमधील कुटुंबाला वाचवण्यात यश आले आहे. पुणे अग्निशामक दलाने शुक्रवारी एसएम जोशी पुलाखालून या सर्वांना बाहेर काढच एका कुटुंबातील पाच जणांना वाचवले. अधिकाऱ्यांनी कुणाल ललवानी (28), प्रिया ललवानी (22), कपिल ललवानी (21), वंचिता ललवानी (13) आणि कृष्णा ललवानी (8) अशी कुटुंबीयांची कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत. गरवारे कॉलेजजवळील (Garware college) एस. एम. जोशी पुलाखाली नदीत एक कार तरंगत असल्याचा फोन अग्निशामक दलाच्या (Firebrigade) नियंत्रण कक्षाला मध्यरात्री 1.46 वाजता आला. अग्निशामक अधिकारी राजेश जगताप, चालक ज्ञानेश्‍वर खेडेकर, अग्निशामक दलाचे जवान किशोर बने, दिलीप घाडशी, संदिप कार्ले यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि कारमधून सर्वांना सुखरूपपणे बाहेर काढले. दरम्यान, हे कुटुंब अत्यंत भयभीत झालेले पाहायला मिळत होते.

पालघर जिल्ह्यातील कुटुंब

अग्निशमन दलाच्या जवानांनी नदीत उड्या टाकत प्रवेश केला आणि दोरी, लाइफ जॅकेट आणि इतर उपकरणे वापरून कुटुंबातील सदस्यांची सुटका केली. हे कुटुंब मूळचे पालघर जिल्ह्यातील असून ते नातेवाईकांना भेटण्यासाठी पुण्याला आले होते. नदीकाठी रस्त्याने जात असताना त्यांची कार प्रवाहात वाहून गेली होती. त्यानंतर ते पुलाखाली एका ठिकाणी अडकले होते. मुसळधार पावसानंतर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने रात्री नदीचा प्रवाह तीव्र झाला होता. घटनेची माहिती मिळताच पुणे शहर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी जमलेल्या गर्दीवर पोलिसांनी नियंत्रण मिळवले तर अग्निशामक दलाने बचावकार्य केले.

हे सुद्धा वाचा

अग्निशामकचे मदतकार्य

सतर्कतेचा इशारा

राज्यात सध्या सर्वदूर पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी पाहावयास मिळत आहे. पुण्यासह राज्याला रेड अलर्ट हवामान विभागाने आधीच घोषित केला आहे. अत्यावश्यक असल्याशिवास प्रवास करू नये, अशा सूचना आणि सतर्कतेचा इशारादेखील देण्यात आला आहे. त्यातही मुंबई-पुणे आणि परिसरात दरडी कोसळण्याच्याही घटना घडत आहेत. संभाव्य हानी टाळण्यासाठी प्रशासनातर्फे काळजीही घेण्यात येत आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या घटना होऊ नयेत, यासाठी नागरिकांनी अधिक सतर्क राहणाचे आवाहन करण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.