Pune crime : मांजरीच्या माजी सरपंचावर गोळीबार; डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न, पुण्याच्या हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल

याप्रकरणी पोलिसांनी नंदू शेडगे, चंद्रकांत घुले आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, धारवडकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या डोक्याला आठ टाके पडल्याचे समजते.

Pune crime : मांजरीच्या माजी सरपंचावर गोळीबार; डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न, पुण्याच्या हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल
माजी सरपंच अण्णा धारवडकर
Image Credit source: Youtube
योगेश बोरसे

| Edited By: प्रदीप गरड

May 05, 2022 | 10:49 AM

पुणे : हडपसर येथे मांजरीच्या माजी सरपंचावर गोळीबार (Firing on former sarpanch) करण्यात आला आहे. दोन गटात झालेल्या वादामुळे गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे. मांजरी बुद्रुकचे माजी सरपंच अण्णा धारवडकर यांच्यावर हा गोळीबार करण्यात आला. यामध्ये ते जखमी झाल्याने त्यांना नोबल हॉस्पिटल (Noble hospital) येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. हॉटेलमध्ये एकाच टेबलवर बसलेल्याचे दुसऱ्याशी भांडण झाले. त्याने साथीदारांना बोलावून हा गोळीबार केला. तसेच दगड, विटाने मारहाण करून जीवे मारण्याचाही प्रयत्न केला. दरम्यान अण्णा धारवडकर यांनी गोळी चुकवल्याने त्यांचा जीव वाचला असला तरी डोक्याला मात्र मार लागला आहे. सध्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. हडपसर पोलीस (Hadapsar police) अधिक तपास करत आहेत.

हॉटेलमध्ये मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अण्णा धारवडकर हे काही जणांसोबत रात्री हॉटेल श्रीराम याठिकाणी जेवणासाठी गेले होते. त्यांच्या टेबलवर बसलेल्या संजय झुरंगे याचे चंद्रकांत घुले याच्याबरोबर भांडण झाले. धारवडकर यांचा या सर्व वादाशी काहीह संबंध नव्हता. भांडणानंतर घुले याने फोन करून साथीदारांना बोलावले. धारवडकर जेवण करून हॉटेलमधून बाहेर पडत होते. त्याचवेळी दुचाकीवरून तिघेजण तेथे आले.

दगड, विटांनी मारहाण

त्यांच्यातील एकाने धारवडकर यांच्या दिशेने गोळीबार केला. ती गोळी धारवडकर यांना लागली नाही. त्यानंतर त्यांनी धारवडकर यांना दगड, विटांनी मारहाण केली. या मारहाणीमुळे ते जखमी झाले आहेत. याचवेळी कोणी वाचवायला आले, तर त्यांनाही मारहाण करू, अशी धमकी आरोपींनी दिली. हा गोंधळ घालून आरोपी तिथून पळून गेले. याप्रकरणी पोलिसांनी नंदू शेडगे, चंद्रकांत घुले आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, धारवडकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या डोक्याला आठ टाके पडल्याचे समजते.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें