दुचाकीवरुन दोनजण आले, गोल्डमॅनवर दिवसाढवळ्या भर चौकात गोळीबार, आरोपी फरार, वाचा थरार

गोल्डमॅन सचिन नानासाहेब शिंदे याच्यावर काही अज्ञातांनी दुचाकीवरुन येऊन गोळ्या झाडल्याची घटना आज (9 फेब्रुवारी) दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली (Firing on Pune Goldman Sachin Shinde in Haveli Taluka).

दुचाकीवरुन दोनजण आले, गोल्डमॅनवर दिवसाढवळ्या भर चौकात गोळीबार, आरोपी फरार, वाचा थरार
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 7:03 PM

पुणे : हवेली तालुक्यातील गोल्डमॅन सचिन नानासाहेब शिंदे याच्यावर काही अज्ञातांनी दुचाकीवरुन येऊन गोळ्या झाडल्याची घटना आज (9 फेब्रुवारी) दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत सचिन शिंदे याचा मृत्यू झाला. लोणीकंद ग्रामपंचायत कार्यालयासमोरील रस्त्यावर थेरुर फाटा येथे ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. परिसरातील नागरिकांनी सचिन शिंदेला रुबी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला (Firing on Pune Goldman Sachin Shinde in Haveli Taluka).

सचिन शिंदे हा दुपारी लोणीकंद येथे एटीएमसमोर आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत उभा होता. यावेळी अॅक्टिव्हा गाडीवरुन दोन जण चौकात झाले. त्यांनी योग्य संधी साधत सचिन शिंदेच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. त्यानंतर ते प्रचंड वेगात तिथून फरार झाले. या गोळीबारानंतर सचिन शिंदे प्रचंड रक्तबंबाळ झाला. जास्त रक्तस्त्राव झाल्याने तो जमिनीवर कोसळला. या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलीसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, लोणीकंद गावातील काही नागरिकांनी सचिनला तातडीने रुबी रुग्णालयात आणले. मात्र, सचिनवर उपचार होण्याआधीच त्याने जीव सोडला. या घटनेमागील आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र, अद्याप कुणाला अटक करण्यात आलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन शिंदेवर खुनाच्या गुन्ह्यासह अनेक गुन्हे दाखल आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांच्या रेकॉर्डवर सचिन विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे (Firing on Pune Goldman Sachin Shinde in Haveli Taluka).

दरम्यान, पुणे जिल्ह्यात गोळीबाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. गेल्या एका महिन्यापासून गोळीबाराची ही तिसरी घटना आहे. गेल्या 20 दिवसांपूर्वीच गोळीबाराच्या दोन घटना समोर आल्या होत्या. आता ही भरदुपारी गोळीबाराची घटना घडल्याने लोणीकंद परिसरात गुंडांची दहशत पसरली आहे.

हेही वाचा :

जुनं भांडण पुन्हा नव्याने उकरलं, दोन गट आपसांत भिडले, तडीपार गुंडांकडून हत्या, नाशिकमध्ये खळबळ

प्रियकराच्या साथीने पतीची हत्या, पोलिसांनी पाच महिन्यांनी प्रेमी युगुलाला पकडलं

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.