Pune crime : अमित देशमुख आणि अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून फसवणूक, देहू रोड पोलिसांकडून एकाला अटक

आरोपी शुभम पाटील काही दिवसांपूर्वी झालेल्या वैद्यकीय भरतीमध्ये वेटिंगवर असलेल्या उमेदवारांना हेरून फसवणूक करत होता, असे तपासात समोर आले आहे. अशाच प्रकारच्या फसवणूक प्रकरणात नवी मुंबईतदेखील शुभम पाटीलवर गुन्हा दाखल असून त्यात तो अटक आहे.

Pune crime : अमित देशमुख आणि अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून फसवणूक, देहू रोड पोलिसांकडून एकाला अटक
देहू रोड पोलीस स्टेशनImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 4:51 PM

पिंपरी चिंचवड : माजी मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या (Fake signature) करून नोकरीचे बनावट पत्र दिल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड परिसरात घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल (Filed a crime) करून घेतला आहे. माजी मंत्री अमित देशमुख आणि वैद्यकीय विभागामधील सचिव आणि अन्य अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करण्यात आल्या. त्यानंतर नोकरीचे बनावट नियुक्तीपत्र देऊन फसवणूक करण्यात आली आहे. आता याप्रकरणी एकावर देहूरोड पोलीस ठाण्यात (Dehu road police station) गुन्हा दाखल झाला आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग मुंबई यांच्याकडे ॲम्बुलन्स चालक या पदावर कॉल लेटर देतो असे सांगून आरोपींनी वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने पैसे ट्रान्सफर करून घेतल्याचे उघड झाले आहे. शुभम पाटील (वय 26, रा. अंमळनेर, जळगाव) असे फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

ऑनलाइन पद्धतीने ट्रान्सफर करून घेतले पैसे

परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी सांगितले, की आरोपीने फिर्यादीकडून ऑनलाइन पद्धतीने पैसे ट्रान्सफर करून घेतले. तर काही रक्कम रोख स्वरूपात असे एकूण 6 लाख 66 हजार 500 रुपये घेतले. फिर्यादीचा विश्वास बसावा म्हणून आरोपीने माजी मंत्री अमित देशमुख आणि वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाचे वैद्यकीय सचिव असलेले सौरभ विजय यांची खोटी सही व बनावट असे पत्र देऊन फसवणूक केली. यातील आरोपी शुभम पाटीलवर देहू याठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

आधीही दाखल आहे गुन्हा

आरोपी शुभम पाटील काही दिवसांपूर्वी झालेल्या वैद्यकीय भरतीमध्ये वेटिंगवर असलेल्या उमेदवारांना हेरून फसवणूक करत होता, असे तपासात समोर आले आहे. अशाच प्रकारच्या फसवणूक प्रकरणात नवी मुंबईतदेखील शुभम पाटीलवर गुन्हा दाखल असून त्यात तो अटक आहे. आता या आरोपीचा ताबा आम्ही घेत आहोत. बनावट कागदपत्र कुठे तयार केली, आणखी कुणाला फसवले, इतर कोणते गुन्हे त्याने केले याचा तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.