HSC Result 2021 | बारावीचा निकाल 2 ऑगस्टला जाहीर होण्याची शक्यता, विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढली

जुलैअखेर बारावीचा निकाल जाहीर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती, परंतु बोर्डाचे प्रशासकीय काम राहिल्यामुळे ऑगस्ट महिना उजाडला आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

HSC Result 2021 | बारावीचा निकाल 2 ऑगस्टला जाहीर होण्याची शक्यता, विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढली
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Aug 01, 2021 | 9:00 AM

मुंबई : सीबीएसई बोर्डाच्या (CBSE) परीक्षांचे निकाल जाहीर झाले असताना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या निकालाचीही उत्सुकता (HSC Result 2021) वाढली आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाचा इयत्ता 12 वीचा निकाल उद्या (सोमवार दोन ऑगस्ट) लागण्याची शक्यता आहे. याबाबत बोर्डाकडून दुपारी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती असल्याने निकाल नियोजित वेळेपेक्षा थोडा उशिरा लागणार असल्याची माहिती समोर आली होती. बारावीच्या निकालापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. विद्यार्थी http://mh-hsc.ac.in या वेबसाईटवर भेट देऊन त्यांचा बैठक क्रमांक मिळवू शकतात.

सर्वोच्च न्यायालयाने 31 जुलैपर्यंत निकाल लावण्याचे आदेश दिले होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 16 जुलै रोजी दहावीचा निकाल जाहीर केला. त्यानंतर अकरावीच्या प्रवेशाच्या सीईटीची तारीख जाहीर केली. आता, सर्वांना बारावीच्या निकालाचे वेध लागले आहेत. जुलैअखेर बारावीचा निकाल जाहीर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती, परंतु बोर्डाचे प्रशासकीय काम राहिल्यामुळे ऑगस्ट महिना उजाडला आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

बारावी निकालाचा बैठक क्रमांक कसा मिळवायचा?

स्टेप 1: http://mh-hsc.ac.in या वेबसाईटवरील सर्च सीट नंबरवर जावा स्टेप 2: यानंतर तुमचा जिल्हा आणि तालुका निवडा स्टेप 3: त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव आडनाव, तुमचं नाव, वडिलांचं नाव याप्रमाणं नमूद करावा स्टेप 4: यानंतर सबमिट करा तुम्हाला तुमचा सीट नंबर मिळेल

बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला नेमका काय?

महाराष्ट्र सरकारने कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. शालेय शिक्षण विभागानं शासन निर्णय काढून बारावी निकालाचा फॉर्म्युला प्रसिद्ध केला. महाराष्ट्र सरकारने बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेला आहे. दहावीसाठी 30 टक्के, अकरावीसाठी 30 टक्के आणि बारावीसाठी 40 टक्के अशी विभागणी करण्यात आली आहे.

निकाल कसा लावणार?

इयत्ता दहावीच्या गुणांना 30 टक्के भारांश

दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यानं सर्वाधिक गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरले जातील.

इयत्ता अकरावी 30 टक्के भारांश

इयत्ता अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण

इयत्ता बारावीसाठी 40 टक्के भारांश

बारावीच्या वर्गासाठी 40 टक्के बारांश निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये प्रथम सत्र निहाय परीक्षा, सराव परीक्षा , सराव चाचण्या आणि तस्तम मूल्यमापन यामधील विषय निहाय गुण यावर विद्यार्थ्यांना गुण दिले जातील.

बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील गुणांना सर्वाधिक वेटेज

बारावी निकालासंदर्भात जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाला सर्वाधिक वेटेज दिलं गेलं आहे. बारावी निकाल जाहीर करण्यासाठी महाविद्यायांना या शासन निर्णयाचा आधार घ्यावा लागणार आहे. बारावीच्या परीक्षेला बसलेले खासगी विद्यार्थी, पुन्हा परीक्षा देणारे विद्यार्थी यांच्यासाठी वेगळा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे. त्यासंबंधी अधिक माहिती शासन निर्णयात पाहायला मिळेल.

संबंधित बातम्या :

बोर्डाकडून बारावीचे बैठक क्रमांक जाहीर, सीट नंबर कसा मिळवायचा? वाचा सोप्या टिप्स

(HSC Result 2021 Maharashtra msbshse may declare class 12th result on 2nd August)

Non Stop LIVE Update
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.