AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

 मनसेचा निर्णय ; रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणासह 11 किल्ल्यांवर  शिवशाहीर पुरंदरेंच्या अस्थींचे विसर्जन करणार

शिवशाहीर पुरंदरेंच्या जाण्याने न भरून निघणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. बाबासाहेंबाचा शिवशाही विचार पुढे घेऊन जाण्याचे काम मनसे करणार असल्याची माहितीही पुणे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

 मनसेचा निर्णय ; रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणासह 11 किल्ल्यांवर  शिवशाहीर पुरंदरेंच्या अस्थींचे विसर्जन करणार
| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 2:28 PM
Share

पुणे- इतिहासकार, नाटककार, साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे नुकतेच निधन झाले आहे. 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेब पुरंदरेंनी शिवसाधनेचा ध्यास घेत तोच वसा आयुष्यभर जपला. महाराष्ट्र नवा निर्माण सेनेनं पुरंदरेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्थीचं विसर्जन 11 किल्ल्यांवर करण्याचा निर्णय घेतला आहे. रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, पन्हाळगडसह 11 किल्ल्यांवर अस्थींचे विसर्जन केले जाणार आहे.

बाबासाहेंबाचा शिवशाही विचार पुढे नेणार पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात शिवशाहिरांच्या अस्थी दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. या अस्थींचे दर्शन घेण्यासाठी सकाळ पासूनच मनसेच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी तसेच बाबासाहेब पुरंदरेप्रेमींनी गर्दी केली होती. यावेळी शिवशाहीर पुरंदरेंच्या जाण्याने न भरून निघणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. बाबासाहेंबाचा शिवशाही विचार पुढे घेऊन जाण्याचे काम मनसे करणार असल्याची माहितीही पुणे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

माझ्यासाठी ते पितृतुल्य – राज ठाकरे काल शिवशाहीर पुरंदरे यांच्या निधनाची माहिती मिळताच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात दाखल झाले. बाबासाहेबांच्या घरी दाखल होत त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत त्यांना श्रद्धांजली वाहिली. याचबरोबरच राज ठाकरे यांनी आपलया अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करतही श्रद्धांजली अर्पण केली आहे. ”बाबासाहेबांनी आपले आयुष्य शिवचरित्र सांगण्यासाठी खर्च केलं , वर्तमानतील प्रश्न आणि भविष्यातील आव्हानं याबाबत कायम त्यांच्याकडून मार्गदर्शन होत आलं , माझ्या व्यक्तिगत आयुष्यात ते माझे मार्गदर्शक तर होतेच पण पितृतुल्यही होते. बाबासाहेब मला नेहमी सांगता महाराजांचा जिथं जिथं पदस्पर्श झाला आहे तिथं तिथं मी अनेकदा जाऊन आलो आहे. आता फक्त एकच जागा उरली आहे ती म्हणजे महाराज जिथं गेले तिथं जायची. शिवछत्रपतींचा सेवक आज साक्षात छत्रपतींची सेवक करण्यासाठी निघाला, अशी भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

5 लाख घरात पोचवले शिवचरित्र

शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनी अथक संशोधनातून आणि परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला. या ग्रंथाच्या 16 आवृत्ती आजपर्यंत सुमारे 5 लाख घरांमध्ये पोहोचल्यात. या पुस्तकाची 17 वी आवृत्ती 31 मार्च 2014 ला प्रसिद्ध झाली. बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन व जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले. पुरंदऱ्यांची दौलत, पुरंदऱ्यांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड आणि राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांचे आजवर साहित्य प्रकाशित झालेय.

हेही वाचा

महावितरणाचा झटका ; पुणे जिल्हा परिषदेच्या 800 शाळा अंधारात , बिल न भरल्याने केली कारवाई

VIDEO | चुलत भावाची चूक जीवावर बेतली, पिंपरी-चिंचवडमध्ये तीन वाहनांच्या विचित्र अपघातात तरुणाचा मृत्यू

शिवशाहीर पुरंदरे यांनी छत्रपतींच्या इतिहासासाठी आयुष्य खर्ची घातलं, पण त्यात काही वादग्रस्त मुद्दे, शरद पवारांची प्रतिक्रिया

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.