बैलगाडी शर्यत होणार की नाही?, मंगळवारी विशेष बैठक; जयंत पाटलांची माहिती

आपली मानसिकता अशी झाली आहे की लोकमताचा आदर करता करता आपण मतांचा आदर जास्त करू लागलो आहे, अशी खंत व्यक्त करतानाच हे बदलण्याची गरज आहे. (jayant patil reaction on bullock cart race)

बैलगाडी शर्यत होणार की नाही?, मंगळवारी विशेष बैठक; जयंत पाटलांची माहिती
jayant patil

सांगली: आपली मानसिकता अशी झाली आहे की लोकमताचा आदर करता करता आपण मतांचा आदर जास्त करू लागलो आहे, अशी खंत व्यक्त करतानाच हे बदलण्याची गरज आहे, असे वक्तव्य जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. ते सांगलीत पूर परिषदेत बोलत होते. तसेच येत्या 24 ऑगस्ट रोजी बैलगाडी शर्यतीबाबत बैठक होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. (jayant patil reaction on bullock cart race)

एखाद्या पोलिसांना काम केले नाही तर त्याची बदली केली जाते. जर एखाद्या इंजिनीयरने बांधकामाला परमिशन दिली नाही की आपण त्याला मदत करण्या ऐवजी आपण ते करून घेतो. हे बदलण्याची गरज आहे. आपण आपली मानसिकता अशी झाली आहे की लोकमताचा आदर करता करता मतांचा आदर जास्त करू लागलो आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

मोहनजेदरो सारखीच कृष्णा काठची संस्कृती

मोहनजेदारो जशी संस्कृती होती तशीच संस्कृती कृष्णा काठची आहे. ही संस्कृती जपायची असेल तर आपण राजकीय गोष्टी बाजूला ठेवून काम करायला हवे. कृष्णामाई, वारणेच्या पाण्यावर आपले जीवन अवलंबून आहे. या नद्यांनीच आपल्याला घडवले. ती कृष्णामाई आपल्यावर का नाराज होते याचा विचार करण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले.

बैलगाडी शर्यत परवानगीबाबत बैठक

बैलगाडी शर्यतीला परवानगी देण्याच्या बाबतीत येत्या 24 ऑगस्ट रोजी पशुधन विकास मंत्र्यांबरोबर बैठक होणार आहे. या बैठकीत मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असं त्यांनी सांगितलं. आमदार गोपीचंद पडळकर यांनी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त असतानाही बैलगाडी शर्यती घेतली होती. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. बैल गाडी शर्यतीबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला आहे. तो माहीत असताना शर्यत घेणं योग्य नाही. कोर्ट शर्यत का घेतली हा जाब विचारू शकतं. त्यामुळे त्यांनी निर्णय घेतले असतील, असं ते म्हणाले. सांगली जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीबाबत लवकरच जिल्ह्यातल्या नेते, कार्यकर्त्यांशी बोलू. तसेच सहकारात राजकारण नसावे ही आपली भावना आहे, असेही त्यांनी स्पष्ट केलं. (jayant patil reaction on bullock cart race)

 

संबंधित बातम्या:

उपमुख्यमंत्री अजित पवार आम्हाला साथ देत नाहीत, यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप

VIDEO | सासऱ्यांच्या समाधीस्थळी डॉ. भारती पवार भावूक, सासूबाईंनी मिठी मारताच रडू कोसळले

Maharashtra News Live Update : बैलगाडा शर्यतीबाबत महत्त्वाची बैठक होणार, मंत्री जयंत पाटलांची माहिती

(jayant patil reaction on bullock cart race)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI