डॉक्टर नवरा-बायकोचं साध्या पद्धतीने लग्न, HIV वर काम करणाऱ्या संस्थेला 1 लाखांची मदत

जयसिंगपूरच्या डॉक्टर नवरदेवाचं साध्या पद्धतीने लग्न करुन बचत कलेले पैशातून HIV अनाथाला एक लाखांची मदत केली आहे.

डॉक्टर नवरा-बायकोचं साध्या पद्धतीने लग्न, HIV वर काम करणाऱ्या संस्थेला 1 लाखांची मदत

जयसिंगपूर (कोल्हापूर) : जयसिंगपूरच्या डॉक्टर नवरदेवाचं साध्या पद्धतीने लग्न करुन बचत कलेले पैशातून HIV अनाथाला एक लाखांची मदत केली आहे. समाजात लग्नांवर लाखो रुपयांच्या उधळपट्टीचं फॅड आलेलं असताना डॉक्टर वराने उचललेलं हे पाऊल नक्कीच स्वागतार्ह आहे तसंच कौतुकास्पद आहे. (Jaysingpur newlyweds doctor Couple 1 lakh Rupees help Sewalay HIV Sanstha Latur)

कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर शहरातील डॉक्टर स्वप्निल कनीरे आणि लातूरच्या प्रीती निटूरे या नववर-वधूंनी आपले लग्न साध्या पद्धतीने करुन लातूर येथील सेवालय एचआयव्ही अनाथाला एक लाख रुपयांची देणगी दिली आहे. नवदाम्पत्यांनी उचललेल्या पावलाचं जयसिंगपूरमध्ये कौतुक होतंय.

जयसिंगपूर शहरातील डॉक्टर स्वप्निल किनी रे हे गेल्या सहा वर्षापासून डॉक्टर म्हणून काम करत आहेत. तसेच लातूर येथील असणाऱ्या प्रीती निटुरे याही डॉक्टर आहेत. या दोघांचा विवाह सोहळा अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

दोन्ही परिवार एकत्रित येऊन लग्न सोहळा साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला  होता. जो वायफळ निधी खर्च होतो तो निधी एका संस्थेला देण्याचं या परिवाराने ठरवलं होतं. गेल्या दोन दिवसांपूर्वी हा विवाह सोहळा पार पडला आहे.

दोन्ही परिवारांनी एकमताने निर्णय घेऊन लातूर येथील HIV अनाथालायाचे प्रमुख रवी बापटले यांना लग्न सोहळ्याच्या निमित्ताने एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. या दोन्ही परिवाराने घेतलेल्या निर्णयाचं कौतुक होऊ लागले आहे. विवाह सोहळ्याला दोन्ही परिवारातील नातेवाईक मान्यवर उपस्थित होते. कोरोनाचे नियम पाळून हा विवाह सोहळा संपन्न झाला.

(Jaysingpur newlyweds doctor Couple 1 lakh Rupees help Sewalay HIV Sanstha Latur)

हे ही वाचा

घरी येताना चांगले कपडे घालून ये, बायकोच्या प्रश्नावर अजिंक्य क्लीन बोल्ड, म्हणाला….

PHOTO | मैत्री-प्रेम-लग्न, पाहा ‘ब्लॅक बेल्ट’ कर्णधार अजिंक्य-राधिकाची ‘प्यारवाली लव्हस्टोरी’

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI