Lakdi Nimbodi Scheme : लाकडी निंबोडी योजनेला अखेर मंजुरी; पुण्यातल्या इंदापुरात दत्तात्रय भरणेंच्या प्रतिकात्मक पोस्टरला दुग्धाभिषेक!

Lakdi Nimbodi Scheme : लाकडी निंबोडी योजनेला अखेर मंजुरी; पुण्यातल्या इंदापुरात दत्तात्रय भरणेंच्या प्रतिकात्मक पोस्टरला दुग्धाभिषेक!
दत्तात्रय भरणे यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला दुग्धाभिषेक घालताना पोपट शिंदे आणि कार्यकर्ते
Image Credit source: tv9

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना ही भीमा (उजनी) प्रकल्पाचाच भाग असल्याने सदर योजनेस प्राधिकरणाच्या मान्यतेची आवश्यकता नाही असे कळविले आहे. त्यानुसार लाकडी निंबोडी उपसा सिंचन या योजनेस एकूण 348.11 कोटी रुपये इतक्या किंमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

प्रदीप गरड

|

May 13, 2022 | 4:39 PM

इंदापूर, पुणे : गेल्या पंचवीस वर्षांपासून इंदापूर तालुक्यात प्रत्येक निवडणुकीत चर्चेत येणाऱ्या लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन योजनेच्या (Lakdi Nimbodi Scheme) 348.11 कोटी इतक्या किंमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यानंतर नगरसेवक पोपट शिंदे यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर शहरामध्ये राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला दुग्धाभिषेक करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे. तर दुसरीकडे ज्या गावात या योजनेचा फायदा होणार आहे, तेथील शेतकऱ्यांनी फटाके वाजवत, पेढे भरवत राज्यमंत्री भरणे यांचा जयजयकार केला आहे. लाकडी-निंबोडी ही योजना या परिसरासाठी महत्त्वाची आहे. ही योजना 30 वर्षांपासून रखडली होती. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या योजनेची माहिती घेतली. तसेच ती पूर्ण करण्यासाठी निधी (Fund) मिळण्यासाठी पाठपुरावा केला होता.

इंदापूर येथे शेतकरी मेळाव्यात दिले होते संकेत

इंदापुर तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न भरणे यांनी शासन दरबारी पोहोचविला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील काही महिन्यात इंदापूर येथे शेतकरी मेळाव्यात या योजनेबाबत संकेत दिले होते. यासाठी प्राथमिक मंजुरीदेखील घेण्याचे काम, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.

‘प्राधिकरणाच्या मान्यतेची आवश्यकता नाही’

आता महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना ही भीमा (उजनी) प्रकल्पाचाच भाग असल्याने सदर योजनेस प्राधिकरणाच्या मान्यतेची आवश्यकता नाही असे कळविले आहे. त्यानुसार लाकडी निंबोडी उपसा सिंचन या योजनेस एकूण 348.11 कोटी रुपये इतक्या किंमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

अशी आहे योजना…

लाकडी निंबोडी योजनेचा भूमिपूजन शुभारंभ खासदार शरद पवार यांच्या हस्ते करणार असल्याचे मंत्री भरणे यांनी सांगितले आहे. कुंभारगांव परिसरातून साधारण 765 हाँर्स पॉवर क्षमतेच्या चार विद्युत पंपाच्या साहाय्याने हे पाणी उचलून शेटफळगडे आणि निरगुडे च्या सीमेवर टाकले जाईल. 640 हॉर्स पॉवरचे 3 पंप व 570 हॉर्स पॉवरचे दोन विद्युत पंप त्या ठिकाणी बसवले जातील. त्यामुळे या योजनेतून इंदापूर तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील 11 हजार एकर शेती ओलिताखाली येईल.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें