AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा Video पहाल तर वडापाव खाणं सोडून द्याल..; लोणावळ्यातील किळणवाणा प्रकार

लोणावळ्यातील चौधरी वडेवाले या उपहारगृहात स्वच्छता आणि आरोग्याचे सर्व नियम वेशीला टांगून पदार्थ बनवले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनीही किळस व्यक्त केला आहे.

हा Video पहाल तर वडापाव खाणं सोडून द्याल..; लोणावळ्यातील किळणवाणा प्रकार
Lonavala Vada PavImage Credit source: Tv9
| Updated on: Jul 15, 2025 | 1:41 PM
Share

लोणावळ्यातल्या प्रसिद्ध उपहारगृहात उंदरांनी चावलेल्या बटाट्यांचे वडापाव आढळल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. लोणावळ्यामधील चौधरी वडापावच्या किचनमध्ये स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं या व्हिडीओमधून उघड झालं आहे. या दुकानाच्या किचनमध्ये खूप घाण आणि उंदरांचा धुमाकूळ पहायला मिळाला. त्याचप्रमाणे साठवलेली अन्नसामग्री, जेवणासाठी वापरण्यात येणारी भांडी आणि पाणी अत्यंत वाईट अवस्थेत होते. धक्कादायक बाब म्हणजे काही सडलेले आणि उंदरांनी खाल्लेले बटाटे वडापाव बनवण्यासाठी वापरले जात होते.

साफसफाईकडे पूर्णपणे दुर्लक्ष

चौधरी वडापावच्या किचनमध्ये आरोग्याच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं तपासणीत उघड झालं. किचनमध्ये खूप घाण होती. उंदरांनी अक्षरश: धुमाकूळ घातला होता. तसंच, खराब अन्नसामग्री साठवलेली होती. धक्कादायक बाब म्हणजे, काही सडलेले आणि उंदरांनी खाल्लेले बटाटे वडापावमध्ये वापरले जात होते. दुकानात साफसफाईकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं होतं. दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेचे कोणतेच नियम पाळले जात नव्हते. स्वयंपाकघरात झुरळं आणि उंदीर फिरत होते.

पहा व्हिडीओ-

हे दुकान लोणावळ्यातील मध्यवर्ती भागात आहे. याच परिसरात अनेक हॉस्पिटल्स आहेत. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक, नर्स, डॉक्टर आणि पर्यटक इथं मोठ्या प्रमाणात खाण्यासाठी येतात. अशा ठिकाणी आरोग्याच्या नियमांचं उल्लंघन करणं धोक्याचं आहे. “सडलेले आणि दूषित अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे विषबाधा, जुलाब, उलटी, पोटदुखी तसंच काही वेळा जीवघेणा संसर्ग होऊ शकतो,” असं डॉक्टरांनी सांगितलं. विशेषतः पर्यटक आणि लहान मुलांसाठी हे खूप धोकादायक आहे. दुकानाच घाणीचं आणि अस्वच्छतेचं साम्राज्य असताना सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तरुणाला चौधरी वडेवाल्यांनी दमदाटी केली. अखेर याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

लोणावळ्यात अनेक पर्यटक फिरायला येतात. वडापाव हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. त्यामुळे पर्यटनक्षेत्राच्या ठिकाणी असलेल्या या दुकानावर वडापाव खाण्यासाठी अनेकांनी गर्दी व्हायची. परंतु इथला किळसवाणा प्रकार उघडकीस आल्यानंतर नेटकऱ्यांनीही संताप व्यक्त केला आहे. संबंधित दुकानदारावर त्वरित कारवाई व्हावी, अशी मागणी नेटकरी आणि पर्यटक करत आहेत.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.