AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Savitribai Phule| भिडेवाड्याच्या राष्ट्रीय स्मारकाचे काम मार्गी लावावे महाराष्ट्र अंनिसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

विद्येचे माहेरघर असा मान मिळालेल्या पुण्यातील हा भिडेवाडा सामाजिक व ऐतिहासिकदृष्ट्या एक अत्यंत महत्वाची वास्तु आहे. ह्या भिडेवाड्याच्या अंगणातच अनेक सामाजिक चळवळीचा देखील जन्म झाला. मात्र शासनाच्या दुर्लक्षामुळे व निष्काळजीपणामुळे ह्या भिडेवाड्याची भीषण दुरवस्था झालेली आहे. ज्या वास्तुमध्ये इतिहास घडला ती वास्तू आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

Pune Savitribai Phule| भिडेवाड्याच्या राष्ट्रीय स्मारकाचे काम मार्गी लावावे महाराष्ट्र अंनिसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
annis
| Edited By: | Updated on: Jan 03, 2022 | 5:44 PM
Share

पुणे – आद्य स्त्रीशिक्षिका सावित्रीबाई फुले ह्यांनी पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींची पहिला शाळा सुरू केली. या भिडेवाड्याचा जीर्णोद्धार करून तिथे राष्ट्रीय स्मारक करावे, या मागणीचे 75 कार्यकर्त्यांच्या सहीचे निवेदन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिवाजीनगर पुणे शाखेने निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांना दिले. निवासी उपजिल्हा अधिकाऱ्यांमार्फत हे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पोचवले जाणार आहे. आज सावित्रीबाई फुलके यांच्या जयंती निमित्तसाधत हे निवेदन देण्यात आले आहे.

संघर्षाचा भिडेवाडा साक्षीदार सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी अनंत हालअपेष्टा सहन करत १ जानेवारी १८४८ पुण्यातील बुधवार पेठेतील तात्यासाहेब भिडे ह्यांच्या भिडेवाड्यात मुली व महिल्यांसाठी पहिली शाळा सुरु केली. महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आण्यासाठी फुले दाम्पत्यानी मोठा संघर्ष केला, प्रसंगी शेणामातीचाही मारा देखील सहन केला. सुमारे पावणेदोनशे वर्षांपूर्वी ह्या भिडेवाड्यात फुले दाम्पन्त्याने मुलीची पहिली शाळा काढणे ही भारतातीलच नवे तर जगाच्या इतिहासातील एक क्रांतिकारक घटना म्हणवी लागेल. ह्या सर्व संघर्षाचा भिडेवाडा साक्षीदार आहे.

निष्काळजीपणामुळे  भिडेवाड्याची भीषण दुरवस्था विद्येचे माहेरघर असा मान मिळालेल्या पुण्यातील हा भिडेवाडा सामाजिक व ऐतिहासिकदृष्ट्या एक अत्यंत महत्वाची वास्तु आहे. ह्या भिडेवाड्याच्या अंगणातच अनेक सामाजिक चळवळीचा देखील जन्म झाला. मात्र शासनाच्या दुर्लक्षामुळे व निष्काळजीपणामुळे ह्या भिडेवाड्याची भीषण दुरवस्था झालेली आहे. ज्या वास्तुमध्ये इतिहास घडला ती वास्तू आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आतल्या भिंती पूर्णपणे पडलेले असून लाकडी छतही मोडून पडले आहे. वाड्याची अवस्था इतकी वाईट आहे कि हा संपूर्ण वाडा कधी जमीनदोस्त होईल, ह्याची शाश्वती नाही. ह्या संदर्भात पुरोगामी संस्था संघटनांनी अनेक वेळा मोर्चा आंदोलने केल्यानंतर देखील कामाला गती नाही. स्मारक बनावे ह्या साठी अशाप्रकारे सरकारला निवेदन द्यावे लागते आहे हे जास्त खेदजनक व लाजिरवाणी गोष्ट आहे. ह्या क्रांतिकारी इतिहासाचे जतन व्हावे म्हणून भिडेवाड्याचा जिर्णोधार करावा व ह्या वाडयाला लवकरात लवकर राष्ट्रीय स्मारक बनवावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, राज्यपदाधिकारी विशाल विमल, शिवाजीनगर शाखेच्या अध्यक्षा वनिता फाळके, ज्येष्ठ कार्यकर्ते सदाशिव फाळके, नम्रता ओव्हाळ, स्वप्नील भोसले, अरीहंत अनामिका उपस्थित होते.

पाच महिने संघाबाहेर होता, द्रविड कोच होताच ‘या’ खेळाडूचं पालटलं नशीब

गोव्यात आलेल्या कॉर्डेलिया जहाजात 66 कोरोना पॉझिटिव्ह, प्रशासन उतरण्याची परवानगी देणार?

Best Hatchback Cars : भारतीयांच्या खिशाला परडवणाऱ्या हॅचबॅक कार, पाहा टॉप 5 गाड्या

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.