AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे मेट्रो कारशेडचे काम सुरु असताना कामगाराचा मृत्यू, 50 फूट उंचीवरून पडल्याने जीव गमावला

त्याने सुरक्षाविषयक साहित्य घातले होते मात्र ५० फूट वरुन खाली पडल्याने तो गंभीर जखमी झाला. तातडीने हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला

पुणे मेट्रो कारशेडचे काम सुरु असताना कामगाराचा मृत्यू, 50 फूट उंचीवरून पडल्याने जीव गमावला
मेट्रो कारशेडच्या कामावेळी कामगाराचा मृत्यूImage Credit source: टीव्ही 9
| Edited By: Anish Bendre | Updated on: May 16, 2022 | 12:39 PM
Share

पुणे : पुण्यात मेट्रो कारशेडचे (Pune Metro Car Shed) काम सुरु असताना झालेल्या अपघातात कामगाराला प्राण गमवावे लागले. 50 फूट उंचीवरुन खाली पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली. पुणे शहरात पौड रस्त्यावरील वनाज कंपनीजवळ हा दुर्दैवी अपघात झाला. मूलचंद्र कुमार सीताराम असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. तो मूळ उत्तर प्रदेश येथील राहणारा होता. या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

पुण्यात मेट्रो कारशेडचे काम सुरु असताना झालेल्या अपघातात 50 फूट उंचीवरुन पडून कामगाराचा मृत्यू झाला. पौड रस्त्यावरील वनाज कंपनीजवळ रविवार 15 मे रोजी रात्री उशिरा ही घटना घडली.

मूळ उत्तर प्रदेशचा रहिवासी

या अपघातात मूलचंद्र कुमार सीताराम याला जीव गमवावा लागला. मूलचंद्र कुमार हा मूळ उत्तर प्रदेश येथील रहिवासी होता. कामाच्या निमित्ताने तो पुण्यात आला होता.

उपचारापूर्वीच कामगाराचा मृत्यू

या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कामगाराने सुरक्षाविषयक साहित्य घातले होते, मात्र 50 फूट इतक्या उंचीवरुन खाली पडल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

Follow Us