VIDEO : आईशी भांडून चिमुकला ऑटोग्राफसाठी धावला, राज ठाकरेंनी वसंत मोरेंच्या पाठीवर वही ठेवून सही केली!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. राज ठाकरेंचं फक्त राजकारणातच नाही तर सर्व वयोगटात फॅन्स आहेत. पुणे दौऱ्यात राज ठाकरेंची एक चिमुरडा फॅन दिसून आला .

VIDEO : आईशी भांडून चिमुकला ऑटोग्राफसाठी धावला, राज ठाकरेंनी वसंत मोरेंच्या पाठीवर वही ठेवून सही केली!
सोहम जगताप


पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुणे (Raj Thackeray Pune) दौऱ्यावर आहेत. राज ठाकरेंचं फक्त राजकारणातच नाही तर सर्व वयोगटात फॅन्स आहेत. पुणे दौऱ्यात राज ठाकरेंची एक चिमुरडा फॅन दिसून आला . राज ठाकरे यांनी या फॅनला ऑटोग्राफ दिला. नगरसेवक, मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्या पाठीवर वही ठेवून राज ठाकरे यांनी वहीवर सही केली. यावेळी उपस्थित सर्वजण अचंबित झाले.

राज ठाकरेंच्या पुण्यातील दौऱ्यात या चिमुरड्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतल्याचं बघायला मिळालं. कारण तिसरीत शिकणारा सोहम जगताप आईशी भांडून राज ठाकरेंचा ऑटोग्राफ घ्यायला आला होता. राज यांनीही मग खुल्या दिल्याने या चिमरड्या फँनचे लाड पुरवले.

मी राज ठाकरेंना म्हटलं, ऑटोग्राफ द्या, त्यांनी मग देतो म्हणाले. मला ते आवडतात म्हणून मी त्यांची ऑटोग्राफ घेतली, असं सोहमने सांगितलं.

कसबा मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखती

दरम्यान, राज ठाकरेंनी कसबा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी राज यांनी इच्छुकांची परीक्षा घेतली. प्रभाग रचना कशी आहे, काय कामं केली, लोकांपर्यत पोहोचण्यासाठी काय करता असे प्रश्न विचारले. फ्लेक्स होर्डिंग लावून बॅनरबाजी करण्याऐवजी लोकांच्या मनापर्यंत जा, लोकांची कामं करा, पक्ष संघटना मजबूत करा, असा आदेश राज ठाकरे यांनी दिला.

ठाण्याचा दौरा आटोपून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा पुण्याच्या दौऱ्यावर  आहेत.  काल संध्याकाळी ते पुण्यात पोहोचले. तीन दिवसांच्या या दौऱ्यात ते एकूण 9 मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. तसेच मनसे सैनिकांच्या समस्या ऐकून घेऊन त्या मार्गी लावणार आहेत. पुणे महापालिका निवडणुकीच्या मोर्चेबांधणीच्या अनुषंगाने राज यांचा हा दौरा होत असल्याने त्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

VIDEO : राज ठाकरेंच्या सहीसाठी आईशी भांडण, चिमुकल्या फॅनशी गप्पा

संबंधित बातम्या  

भाजपसोबत युती नाहीच, नाशिकमध्ये मनसे स्वबळावर लढणार, संदीप देशपांडेची घोषणा   

राज ठाकरे पुन्हा पुण्याच्या दौऱ्यावर, तीन दिवस तळ ठोकणार; 9 मतदारसंघांचा घेणार आढावा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI