Video: आप कहाँ से, सर महाराष्ट्र, अच्छा, माझे वंशजही, यूक्रेनमध्ये ज्योतिरादित्य शिंदेंचा मराठी बाणा

युक्रेनचा एअरस्पेस बंद असल्यामुळे शेजारी देश पोलंड, रोमानिया, हंगेरी, स्लोव्हाकिया येथून विमानांद्वारे भारतीयांना आणले जात आहे. यासाठी विदेश मंत्रालयाने 24/7 हेल्पलाइनदेखील लाँच केली आहे.

Video: आप कहाँ से, सर महाराष्ट्र, अच्छा, माझे वंशजही, यूक्रेनमध्ये ज्योतिरादित्य शिंदेंचा मराठी बाणा
भारतीय विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 12:12 PM

नवी दिल्लीः रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा (Russia-Ukraine war) आजचा सलग सातवा दिवस आहे. युक्रेनवरील रशियन हल्ल्यांची तीव्रता अधिकच वाढत चालली आहे. त्यामुळे भारतानंही युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा (Operation Ganga) हाती घेतले आहे. या अंतर्गत केंद्र सरकारच्या वतीने चार मंत्री युक्रेनशेजारील देशात पोहोचले आहे. यात नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Sindhia) यांचाही समावेश आहे. युक्रेनमध्ये युद्ध सुरु असल्यामुळे त्या देशाच्या हद्दीतून विमान उड्डाणास बंदी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोल्दोव्हा आणि बुखारेस्टमार्गे भारतात आणले जाणार आहे. बुखारेस्टमध्ये आणल्या गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांशी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी संवाद साधला. त्यात काही महाराष्ट्रीय विद्यार्थीदेखील होते. सिंधिया यांनी त्यांच्याशी मराठीतून संवाद साधला, तसेच तुम्ही काळजी करू नका, आपण लवकरच भारतात परतू, असे आश्वासन दिले.

पुण्यातील विद्यार्थिशी मराठीतून संवाद

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया बुधवारी युद्धग्रस्त भागातून भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना बाहेर काढण्यासाठी रोमानियाला पोहोचले. त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी, किरण रिजिजू, जनरल व्हि.के. सिंह हेदेखील आहेत. बुखारेस्टला पोहोचल्यानंतर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मायदेशी परतण्याची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्याचा व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. ज्योतिरादित्य सिंधिया विद्यार्थिनीशी बोलताना म्हणाले, तुम्ही महाराष्ट्रीय आहात. मराठी मुलगी आहात का तुम्ही? काय नाव तुझं? पुण्यात तुझं घर आहे का? तुम्ही कुणीही काळजी करू नका.., असे म्हणत त्यांनी इतर विद्यार्थ्यांना उद्देशून हिंदीतून संवाद साधला. ते म्हणाले, उद्या सकाळी येथून विमान निघेल, तुम्हाला भारतात पोहोचवलं जाईल. मी स्वतः विमानतळावर उपस्थित असेन. तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास आम्हाला सांगा. ‘ भाजपचे खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांचा व्हिडिओ ट्वीट केला आहे.

बुखारेस्टहून 1000 विद्यार्थ्यांना परत आणणार

केंद्र सरकारच्या वतीने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा राबवले जात आहे. या अंतर्गत सध्या रोमानियात भारतीय विद्यार्थ्यांना हलवण्यात आले असून लवकरच त्यांना फ्लाइटने भारतात आणले जाणार आहे. युक्रेनचा एअरस्पेस बंद असल्यामुळे शेजारी देश पोलंड, रोमानिया, हंगेरी, स्लोव्हाकिया येथून विमानांद्वारे भारतीयांना आणले जात आहे. यासाठी विदेश मंत्रालयाने 24/7 हेल्पलाइनदेखील लाँच केली आहे.

इतर बातम्या-

रणजितसिंह निंबाळकरांचे निकटवर्तीय दिगंबर आगवणेंची तक्रार, निंबाळकरांनी फसवणूक केल्याचा आरोप

Russia Ukraine War Photo: युद्धाच्या खाईतून भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी मोदी सरकार काय करतंय? पहा ही फोटो स्टोरी

Non Stop LIVE Update
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?.
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.