VIDEO | ‘तात्यासाहेबां’चे भव्य पोस्टर, पुणे मनसे शहराध्यक्ष वसंत मोरेंच्या वाढदिवसाला कोरोना नियमांना हरताळ

वसंत मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते. मोरे यांनी स्वतःच फेसबूक अकाऊंटवर या बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर केला आहे.

VIDEO | 'तात्यासाहेबां'चे भव्य पोस्टर, पुणे मनसे शहराध्यक्ष वसंत मोरेंच्या वाढदिवसाला कोरोना नियमांना हरताळ
पुण्यात वसंत मोरेंच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन


आवेश तांदळे, टीव्ही 9 मराठी, मुंबई : मनसे शहर अध्यक्षांनीच कोरोनासंबंधी नियमांना हरताळ फासल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. वाढदिवस साजरा करताना सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं.

वसंत मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते. मोरे यांनी स्वतःच फेसबूक अकाऊंटवर या बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर केला आहे.

पाहा व्हिडीओ :

पाहा संपूर्ण व्हिडीओ :

पालिका अधिकाऱ्याची गाडी फोडली

कोरोनामुळे निधन झालेल्या नातेवाईकाचे पार्थिव नेण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने गेल्या वर्षी वसंत मोरे यांनी पालिका अधिकाऱ्याची गाडी फोडली होती. तेच वसंत मोरे उर्फ ‘तात्या’ भेटायला येणार आहेत, असं समजताच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या निवृत्त शिक्षकाचं बिलही माफ झालं होतं. खुद्द वसंत मोरेंनीच सोशल मीडियावरुन हा किस्सा सांगितला होता.

वसंत मोरेंची कोरोनाग्रस्तांना मदत

वसंत मोरे यांनी कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात दिल्याचं त्यांच्या ट्विटर अकाऊण्टवर दिसतं. 27 वर्षांची तरुणी सिद्धी परदेशी अनेक दिवसांपासून अनेक आजारांनी ग्रस्त. त्यात भरीला भर कोरोनाने गाठलं. तिला पुण्यात बेड मिळाला नाही. तेव्हा मनसे कार्यकर्त्यांनी तिला चाकणला बेड मिळवून दिला. या पोरांसारखे नगरसेवक जर पुणेकरांनी माझ्या साथीला 2022 ला निवडून दिले तर कोरोनासारख्या अडचणीलाही सहज हरवेन, असा विश्वास वसंत मोरे यांनी व्यक्त केला आहे.

“पाच दिवसात जर मी एकटा साई स्नेह हॉस्पिटलच्या मदतीने एका हॉटेलच्या हॉलमध्ये 40 बेड ऑक्सिजन आणि 40 बेड होम आयसोलेशन हॉस्पिटल चालू करू शकतो, तर मग पुणे महानगरपालिकेच्या 168 नगरसेवकांनी प्रत्येकी फक्त 10 बेड केले असते तर आज संपूर्ण पुणे शहरात 1680 बेड तयार झाले असते. आणि आपण पुणेकरांना वाचवू शकलो असतो. अजूनही वेळ गेलेली नाही.” असं ट्वीट मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी केलं आहे.

संबंधित बातम्या :

रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने संताप, पुण्यात मनसे नगरसेवकाने पालिका अधिकाऱ्याची गाडी फोडली

Video | “योग्य वेळी दांडक्याला हात घातला” पुणे पालिका अधिकाऱ्यांची गाडी फोडणाऱ्या मनसे नगरसेवकाचा नवा किस्सा

आईशी भांडून चिमुकला ऑटोग्राफसाठी धावला, राज ठाकरेंनी वसंत मोरेंच्या पाठीवर वही ठेवून सही केली!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI