Dilip Mohite Patil : ‘मातोश्रीबाहेर मोर्चा काढायचा होता, मग समजली असती हल्ल्याची किंमत काय मोजावी लागते ते..’

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (ST Employees strike) हा प्रश्न राज्याचा होता. तुम्हाला मोर्चाच (Morcha) आणि हल्लाच करायचा होता तर मातोश्रीवर (Matoshree) करायचा. मग तुम्हाला कळले असते हल्ल्याची किंमत काय मोजायला लागले ती, अशी टीका दिलीप मोहिते पाटील यांनी केली.

Dilip Mohite Patil : 'मातोश्रीबाहेर मोर्चा काढायचा होता, मग समजली असती हल्ल्याची किंमत काय मोजावी लागते ते..'
राष्ट्रवादीच्या निषेध मोर्चात बोलताना दिलीप मोहिते पाटीलImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 3:52 PM

पुणे : एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (ST Employees strike) हा प्रश्न राज्याचा होता. तुम्हाला मोर्चाच (Morcha) आणि हल्लाच करायचा होता तर मातोश्रीवर (Matoshree) करायचा. मग तुम्हाला कळले असते हल्ल्याची किंमत काय मोजायला लागले ती… अशा शब्दांत हल्लेखोर आणि त्यामागे असणाऱ्या शक्तीचा राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी समाचार घेतला. राज्याचे परिवहन खाते अनिल परब यांच्याकडे आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचे मग तुम्हाला जे काय करायचे ते ज्याच्याकडे खाते आहे, तिकडे करायचे. ज्या विषयाशी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा संबध नाही, जो विषय पवारसाहेब हाताळत नाहीत, त्यासाठी जाणीवपूर्वक हल्ला घडवून आणण्यामागे काही लोकांचा विशिष्ट हेतू आहे, अशी टीका मोहिते पाटील यांनी केली.

‘राष्ट्रवादी काँग्रेसला अस्थिर करण्याचा प्रयत्न’

महाविकास आघाडी सरकार चालविण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वात मोठा वाटा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला अस्थिर करण्यासाठी हल्ला घडवून आणल्याचा आरोप दिलीप मोहिते पाटलांनी केला आहे. राजगुरूनगर येथून पुणे-नाशिक महामार्गावरून राजगुरूनगर पोलीस स्टेशनवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी महिलांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील बोलत होते.

एसटी कर्मचाऱ्यांचे काय म्हणणे?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी (MSRTC) तासभर राडा केला. शरद पवार आमच्या एसटीच्या विलीनीकरणाच्या आड आले, असा आरोप करत काल एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन केले होते. त्यानंतर आज राष्ट्रवादीतर्फे विविध ठिकाणी निषेध मोर्चा काढण्यात आला.

आणखी वाचा :

Ajit Pawar Pune : ‘लोकांना भावनिक बनवून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार’; पुण्यातल्या कार्यक्रमात राज ठाकरेंना टोला

Video : उन्हाचा तडाखा गुरांनाही! राजगुरूनगरात शेतकऱ्यानं जनावरांसाठी ठेवलेलं वैरण जळून खाक

Ajit Pawar On St: त्याला काहीच अर्थ नाही, भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया अजित पवारांनी उडवून लावल्या

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.