सुप्रिया सुळेंची दोन वेळा साथ सोडणाऱ्या मतदारसंघात राष्ट्रवादीचा ‘सरप्राईज’ उमेदवार?

तिकीट मिळाल्यास त्यांना भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांचं आव्हान असेल. पण खडकवासल्यात राष्ट्रवादीचा (Khadakwasla Rupali Chakankar) मार्ग खडतर असल्याचं सांगितलं जातंय.

सुप्रिया सुळेंची दोन वेळा साथ सोडणाऱ्या मतदारसंघात राष्ट्रवादीचा 'सरप्राईज' उमेदवार?
Follow us
| Updated on: Oct 01, 2019 | 10:14 PM

पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी आता जवळपास सर्वच पक्षांनी उमेदवारी जाहीर केली आहे. पण काही मतदारसंघातील उमेदवार जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. अशाच एका मतदारसंघापैकी एक म्हणजे खडकवासला मतदारसंघ. या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर (Khadakwasla Rupali Chakankar) देखील आहेत. तिकीट मिळाल्यास त्यांना भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांचं आव्हान असेल. पण खडकवासल्यात राष्ट्रवादीचा (Khadakwasla Rupali Chakankar) मार्ग खडतर असल्याचं सांगितलं जातंय.

खडकवासला हा बारामती लोकसभा मतदारसंघात असलेला महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात आता भाजप विजयी हॅटट्रिक साधण्यासाठी सज्ज झालाय. भाजपचा आमदार असलेल्या या मतदारसंघात राष्ट्रवादीचा झेंडा रोवण्यासाठी सध्या जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पण, भाजपचे दोन वेळा आमदार असलेल्या भीमराव तापकीर यांचं आव्हान मोडून काढणं शक्य आहे हा मोठा प्रश्न आहे.

सध्या राष्ट्रवादीतून अनेक जण इच्छुक आहेत. त्यापैकीच एक नाव म्हणजे रूपाली चाकणकर…. त्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. शिवाय मतदारसंघात देखील त्यांचा राबता चांगला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे देखील उमेदवारीचे प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं जातं.

खडकवासला मतदारसंघात झपाट्याने शहरीकरण झालंय. पुणे महापालिका हद्दीतील काही गावे आणि खडकवासलातील ग्रामीण भाग मिळून हा मतदारसंघ तयार झालाय. 15 वर्षात झपाट्याने शहरीकरण झाल्याने भाजपचा मतदार या ठिकाणी मोठा आहे. भीमराव तापकीर हे भाजपचे विद्यमान आमदार असले तरी भाजपच्या इच्छुकांची संख्या देखील डझनभर आहे.

राष्ट्रवादीच्या अनेक उमेदवारांपैकी महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, नगरसेवक सचिन दोडके आणि महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची नावं आघाडीवर आहेत. यावेळी महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा खांद्यावर असल्याने निवडणूक लढवणार नसल्याचं चाकणकर म्हणतात. पण, दुसरीकडे पक्षश्रेष्ठीचा आग्रह झाल्यास ‘हम तैयार है’ असं देखील चाकणकर सांगतात.

सध्या खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद दिवसेंदिवस कमी होत आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला त्याचा प्रत्यय आला. त्यामुळेच की काय 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने विशेष लक्ष दिलं. पण, यंदाही लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कांचन कुल यांना खडकवासलामधून जास्त मतं मिळाली. त्यामुळे बारामतीकरांची दोन वेळा साथ सोडणाऱ्या मतदारसंघात राष्ट्रवादी काय चमत्कार करणार त्याकडे लक्ष लागलंय.

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.