पवना धरणातील पाण्यावर तेलाचे तवंग; पिंपरी-चिंचवडला पाण्याचा प्रश्न भेडसावणार

महादेव कांबळे, Tv9 मराठी

Updated on: Apr 08, 2022 | 10:24 AM

पवना धरणातील पाणी सोडण्यासाठी सध्या हायड्रोलिक यंत्रांचा वापर होतो. त्यामुळे पाणी सोडताना त्या हायड्रोलिक यंत्रे सुरु केल्यानंतर त्यातून पाण्याची गळती होऊन मोठ्या प्रमाणात तेल पाण्यात मिसळत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे

पवना धरणातील पाण्यावर तेलाचे तवंग; पिंपरी-चिंचवडला पाण्याचा प्रश्न भेडसावणार
पवना धरणातून निघालेल्या पाण्यावर तेलासारखा तवंग
Image Credit source: TV9

मावळः पिंपरी चिंचवड शहर (Pimpari Chinchwad) आणि मावळ तालुक्याची लाईफ-लाईन (Life Line) असलेल्या पवना धरणातून निघालेल्या पाण्यावर तेलासारखा तवंग दिसून आहे. पाण्यावर तरंग दिसत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ब्राह्मणोली, कोथर्न, येळसे, कडधे या भागातुन जाणाऱ्या पवना नदीवर हा तेलाचा तवंग दिसून येत आहे. पाण्यावर तेलाचा तवंग (Oil spills) दिसून आल्यानंतर संबंधित विभागाला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर धरणातील पाणी सोडण्यासाठी सध्या हायड्रोलिक यंत्रांचा वापर केला जात असल्याने पाण्यात तेलाचा तवंग दिसत असल्याचे स्पष्ट केले गेले.

पवना धरणातील पाणी सोडण्यासाठी सध्या हायड्रोलिक यंत्रांचा वापर होतो. त्यामुळे पाणी सोडताना त्या हायड्रोलिक यंत्रे सुरु केल्यानंतर त्यातून पाण्याची गळती होऊन मोठ्या प्रमाणात तेल पाण्यात मिसळत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पाण्यात तेल मिसळले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हायड्रोलिक यंत्रातून तेल गळती होत असेल तर ती तात्काळ दुरुस्त कराण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.

पाण्याचा गंभीर प्रश्न

पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ तालुक्याची ही लाईफ-लाईन म्हणून ओळखले जाते. पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे पाण्यात दिसणारा तेलाचा तवंग गंभीर बाब आहे असे मत पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली. पाण्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्यातच आता ऐन उन्हाळ्यात ही समस्या निर्माण झाली तर परिसरात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे हायड्रोलिक यंत्रातून तेल गळती होत असेल तर तात्काळ दुरुस्त करुन पाणी समस्या दूर करणे गरजेचे आहे.

एप्रिल मे मध्येच पाणी समस्या

या परिसरातील नागरिकांना असे पाणी मिळाले तर त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे तात्काळ ही समस्या सोडवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. एप्रिल मे महिन्यामध्येच पाण्याची ही समस्या निर्माण झाली आहे. त्या यंत्रातून सातत्याने जर तेलाची गळती होत राहिल तर नागरिकांना पाण्याची चिंता भेडसावणार आहे. सध्या अनेक जिल्ह्यातून पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. त्यामुळे पाण्याचा हा प्रश्न गांभीर्याने सोडवावा अशी मागणी नागरिकांसह महिलांनी केली आहे.

संबंधित बातम्या

Vidarbha Temperature | 11 पैकी 7 दिवस देशात सर्वाधिक तापमान चंद्रपूर, अकोल्यात; विदर्भात 11 एप्रिलपर्यंत उष्णतेच्या लाटा

Nanded : उन्हामुळे गावरान काकडीला विक्रमी दर, शेतकऱ्यांनीच घेतलं Market ताब्यात

CCTV | हिशेब दिला नाही, बापाने 25 वर्षांच्या लेकाला जिवंत जाळलं, पेटलेल्या अवस्थेत पोरगा सैरावैरा

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI