AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेव्हा नगरसेवकच चित्रकार होतो… नगरपालिकेच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानाअंतर्गत नगरसेवकाने रेखाटले भिंतीवर चित्र

इंदापूर नगरपालिकेचे नगसेवक अनिकेत वाघ यांनी 'माझी वसुंधरा' अभियानाअंतर्गत सामाजिक संदेश देणारे चित्र उत्कृष्टरित्या भिंतीवर रेखाटले.

जेव्हा नगरसेवकच चित्रकार होतो... नगरपालिकेच्या 'माझी वसुंधरा' अभियानाअंतर्गत नगरसेवकाने रेखाटले भिंतीवर चित्र
| Updated on: Dec 15, 2020 | 4:34 PM
Share

इंदापूर : इंदापूर नगरपरिषदेच्यातर्फे सुरु असलेल्या ‘माझी वसुंधरा अभियानात’ शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक संदेश देणारे चित्र शहरातील काही भागात चित्रकार रंगवत असताना इंदापूरकरांना दिसत आहेत. मात्र काल अचानक इंदापूर शहरातील प्रभाग नंबर एकमध्ये पाटबंधारे वसाहतीच्या भिंतीवर चित्र रेखाटताना या प्रभागातील नगरसेवक अनिकेत वाघ दिसले. (Picture on the wall drawn by the Indapur corporator Aniket Wagh)

नगसेवक अनिकेत वाघ यांनी नगरपालिकेच्या अभियानाअंतर्गत सामाजिक संदेश देणारे चित्र उत्कृष्टरित्या भिंतीवर रेखाटले असून त्यांच्या कलेचे शहरात कौतुक केले जात आहे. अनिकेत वाघ यांना शालेय जीवनात चित्र काढण्याचा छंद होता. इंदापूर शहरातील चित्रकार आणि काही पेंटर कलाकारांनी नगरसेवक वाघ यांना चित्र रेखाटण्याची विनंती केल्यानंतर त्यांनी कित्येक वर्षानंतर ब्रश हातात घेतला आणि अत्यंत सुंदर असे सामाजिक संदेश देणारे चित्र त्यांनी भिंतीवर रेखाटले

यासंदर्भात अनिकेत वाघ यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिलीये, त्यात त्यांनी म्हटलंय की, “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” हा जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा अभंग आठवल्याशिवाय राहत नाही. काल इंदापूर शहर प्रभाग 1 मधील पाटबंधारे वसाहत मध्ये जात असताना आपल्या इंदापूर नगरपरिषदेचे कर्मचारी माझी वसुंधरा अभियान या अंतर्गत संपूर्ण इंदापूर शहरात गेले एक महिना चित्रं काढणारे मा. चिंचकर , मा.सोहराब, मा. दिक्षित सर ,व मा. महिपती पेंटर मंडळी भेटली. त्यांनी आपणही एखादे चित्र काढावे असे सांगितले. कारण मागील वर्षीही एक सामाजिक संदेश देणारे चित्र काढले होते… मग काय…उचलला ब्रश लागलो कामाला…

कित्येक वर्षांनी चित्र काढण्याचा योग आला… चित्र पूर्ण झाले… यातून एक कळले की या धकाधकीच्या जीवन प्रवासामध्ये आपण आपल्या छंदाकडे दुर्लक्ष करत आहोत. प्रत्येक व्यक्ती मध्ये एक कला किंवा छंद असते ती त्यांनी जोपासावी.. यामुळे चित्रकारांना प्रोत्साहन मिळाले, नागरिकांना सामाजिक संदेश ही मिळाला व आपल्या प्रभाग 1 मधील शुशोभिकरण करण्यास मदत झाली..”

इंदापूर शहरात अनिकेत वाघ यांच्या कलाकृतीचं कौतुक केले जात आहे. अशाच पद्धतीने जर नागरिकांनीही या मोहिमेमध्ये सहभाग घेतला तर नक्कीच अभियानाअंतर्गत दिले जाणारे पारितोषिक इंदापूर नगरपालिका मिळवेल आणि नगरपालिकेच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला जाईल, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.

नगरसेवक अनिकेत वाघ यांनी लॉकडाऊनमध्ये केले होते सामाजिक काम

नगरसेवक अनिकेत वाघ यांनी लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर अनेक समाजोपयोगी कार्य केले होते. त्यांनी केलेल्या कार्यासाठी अनेक नागरिकांनी त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली होती. त्यांनी त्या वेळी आरोग्य सेविकांसोबत जाऊन स्वत: नागरिकांची तपासणी केली होती. तसेच त्यांनी लॉकडाऊनमध्ये रक्तदान शिबिर, गोरगरीब नागरिकांना मोफत किराणा सामानाचे वाटप, ऑनलाईन स्पर्धा घेऊन विजेत्यांना किराणा सामानाचे किट, व भाजीपाला बक्षीस म्हणून दिले होते, एक आठवडा मोफत ओपीडी व औषधांचा पुरवठा केला होता, असे अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी लॉकडाउनमध्ये राबवले.

(Picture on the wall drawn by the Indapur corporator Aniket Wagh)

संबंधित बातम्या

हरणाची कत्तल करण्यापूर्वी शिकारी ताब्यात, इंदापूर पोलिसांची कारवाई

इंदापूर नगराध्यक्षांच्या मुलाच्या लग्नासाठी रातोरात रस्ता तयार

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.