AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : मोदींच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात कार्यक्रम, राज्यपाल भाषणाच्या सुरुवातीला म्हणाले, तुळजाभवानी माता की जय!

पुण्यात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत 'पुणे ऑन पॅडेलस' या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यपाल यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली. ही रॅली शहराच्या मुख्य रस्त्यावरुन परत जाऊन याचा समारोप कोथरुड येथे झाला.

VIDEO : मोदींच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात कार्यक्रम, राज्यपाल भाषणाच्या सुरुवातीला म्हणाले, तुळजाभवानी माता की जय!
Governor Bhagat Singh Koshyari
| Edited By: | Updated on: Sep 17, 2021 | 10:22 AM
Share

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71 वा वाढदिवस (PM Narendra Modi 71st Birthday) आज देशभरात उत्साहात साजरा होत आहे. भाजपने देशात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. इकडे पुण्यात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत ‘पुणे ऑन पॅडेलस’ या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यपाल यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली. ही रॅली शहराच्या मुख्य रस्त्यावरुन परत जाऊन याचा समारोप कोथरुड येथे झाला.

या कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी मराठी घोषणा करुन भाषणाची सुरुवात केली. तुळजाभवानी माता की जय, असा नारा कोश्यारींनी दिला. त्यावेळी ते म्हणाले तुमचा आवाज पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचला पाहिजे. तुळजाभवानी माता की जय अशा दोन घोषणा दिल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचाही जयजयकार केला.

राज्यपालांची पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनं

यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले, “नरेंद्र मोदी यांची ओळख देश-विदेशात आहे. आपण कुठल्याही पक्षाचे असो आपल्याला त्याचा गर्व होतो. मला सायकल येत असती तर मी सुद्धा सायकल रॅलीमध्ये सहभागी झालो असतो. आता हळूहळू मराठी शिकतोय हे पण शिकतो. देश पुढे जातोय, लोक आपल्याकडे आदराने बघतात, मार्गदर्शक म्हणून पाहतात”

मोदींनी योग दिवस सुरु केला त्यात घुंगट घेणाऱ्या किंवा बुरखा घेणाऱ्या महिलाही त्यात सहभागी होऊ लागल्या. हिमालयात साधना फक्त आपले भारतीय लोक करु शकतात. पर्यावरण रक्षणासाठी सायकल रॅली गरजेची, पण आजच्या दिवसापुरती ती मर्यादित राहू नये पुढेही सुरु ठेवा, असं आवाहन कोश्यारी यांनी केलं.

VIDEO : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं भाषण

संबंधित बातम्या 

PM Modi Untold Stories : लहानपणी मगरीचं पिल्लू पकडून घरी आणलं, नरेंद्र मोदींचे 10 भन्नाट किस्से

हा आमचा विकास नव्हे, आमचा विकास अजून दिसायचा आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मराठवाड्यासाठी 8 मोठ्या घोषणा

भाजपकडून 67 जणांची पहिली यादी जाहीर, कोणत्या वॉर्डमधून कोणाला संधी?
भाजपकडून 67 जणांची पहिली यादी जाहीर, कोणत्या वॉर्डमधून कोणाला संधी?.
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?.
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर.
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी.
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं.
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका.
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.