AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Modi In Pune: मेट्रोतून प्रवास करा, नदी उत्सव साजरा करा; पुणेकरांसाठी मोदींच्या 5 मोठ्या घोषणा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुण्यात येऊन विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ करत पुणेकरांना मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी पुण्यातील मेट्रोचं भूमीपूजन केलं होतं, आज त्यांच्या हस्ते मेट्रोचं लोकार्पणही करण्यात आलं.

Modi In Pune: मेट्रोतून प्रवास करा, नदी उत्सव साजरा करा; पुणेकरांसाठी मोदींच्या 5 मोठ्या घोषणा!
मेट्रोतून प्रवास करा, नदी उत्सव साजरा करा; पुणेकरांसाठी मोदींच्या 5 मोठ्या घोषणा!Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 06, 2022 | 3:00 PM
Share

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी  (Prime Minister Narendra Modi) यांनी आज पुण्यात (pune)  येऊन विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ करत पुणेकरांना मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी पुण्यातील मेट्रोचं (pune metro) भूमीपूजन केलं होतं, आज त्यांच्या हस्ते मेट्रोचं लोकार्पणही करण्यात आलं. त्यामुळे पुणेकरांना आजपासूनच मेट्रोतून प्रवास करता येणार असून पुणेकरांची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. तसेच मोदींना मुळा-मुठा नदीच्या सुशोभिकरणाच्या प्रकल्पांचंही भूमीपूजन केलं आहे. साबरमतीच्या धर्तीवर मुळा आणि मुठा नदी विकसीत होणार आहे. 44 किलोमीटरच्या या नद्यांपैकी 9 किलोमीटरच्या नद्यांचं विकासाचं काम सुरू होणार आहे. नदीकाठ बनवला जाईल. जॉगिंग ट्रॅक आणि सायकल ट्रॅकसह हरितपट्टे या नद्यांभोवती करण्यात येणार आहेत. यावेळी मोदींनी पुणेकरांना दरवर्षी नदी उत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं. तसेच पुण्यासाठी पाच महत्त्वाच्या घोषणाही केल्या.

मोदींच्या पाच महत्त्वाच्या घोषणा

  1. मुळा मुठा नदीला प्रदूषणापासून मुक्त करण्यासाठी 1100 करोड रुपयांचं प्रकल्प सुरु होतोय. सातत्यानं येणारा पूर आणि प्रदूषणमुक्तीसाठी शेकडो कोटी रुपयांचे प्रकल्प कामी येणार आहेत. मुळामुठेची साफसफाई आणि सुशोभिकरणासाठी केंद्र मदत करतंय. नद्या पुन्हा जिवंत झाल्या तर पुणे शहरालाही नवी जान येईल. वर्षातून एक दिवस नदी उत्सव साजरा केला पाहिजे. नदीच्या प्रती श्रद्धा आणि महात्म्य पूर्ण शहरात नदी उत्सवाचं वातावरण तयार केलं पाहिजे. तरच आपल्याला पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं महत्त्व कळेल.
  2. आज पुण्याला एक सुंदर भेट देण्यात आली आहे. आर के लक्ष्मण यांना समर्पित कलादालन तयार करण्यात आलं आहे. एक उत्तम कलादालन पुण्याला मिळालंय. वेगवान विकासासाठी आणि आतापर्यंत केलेल्या कामाचं पुणे प्रशासनाचं आणि पालिकेचं कौतुक आणि अभिनंदन करतो.
  3. पुण्याने शिक्षण, संशोधन, आयटी, बिझनेसमध्येही आपली ओळख मजबूत केलीये. अशात आधुनिक सेवा सुविधा पुण्याच्या लोकांची गरज आहेत. आमचं सरकार पुण्याची गरज ओळखून काम करते आहे. आनंदनगरपर्यंत मी प्रवास केला. ही मेट्रो पुण्यातील मोबिलिटी अधिक सोपी करेल. प्रदूषण आणि वाहतूककोंडी कमी करेल. ईज ऑफ लिव्हिंग वाढवेल. आज महाराष्ट्रात मेट्रोचं जाळ तयार होतंय. आजच्या या दिवशी माझा एक आग्रह आहे. पुणे आणि त्या सर्व शहरांतील लोकांना माझं सांगणं असेल की आपण जेवढं जास्त मेट्रोनं जाल त्याने तुमच्याच शहराला फायदा होणार आहे. 21व्या शतकातील भारताला आधुनिकही बनवायचं आणि त्याला नव्या सुविधाही जोडायच्या आहेत. भविष्यातील योजना लक्षात घेऊन आपण त्यावर काम करतोय.
  4. कोरोना महामारीतूनही मार्ग काढत हा प्रकल्प पूर्ण झालाय. सोलर पॉवरचाही या मेट्रोसाठी वापर होतोय. 25000 टन कार्बन डायऑक्साईडचं एमिशन थांबणार आहे. या प्रकल्पाशी सोडल्या गेलेल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आपलं योगदान पुण्यातील सगळ्यांना फायदेशीर ठरणार आहे. आपल्या देशात वेगानं शहरीकरण होतंय, हे तुम्हाला माहीत आहेत. 2030 पर्यंत आपली लोकसंख्या शहरी लोकसंख्या 60 कोटींच्याही पुढे जाईल. शहरांतील वाढती लोकसंख्या अनेक संधी निर्माण करतेय. पण त्यासोबतच आव्हानंही वाढताहेत.
  5. इलेक्ट्रीक बस, कार, इलेक्ट्रीक गाड्या, स्मार्ट मोबिलीटी, प्रत्येक शहरात सर्क्युलर इकॉनॉमी बेस्ट मॅनेजमेन्ट सिस्टम, आधुनिक सिवरेज ट्रीटमेन्ट प्लांट, वेस्ट टू वेस्ट गोबर प्लांट, बायोगॅस प्लांट, एनर्जी, एफिशियन्स, पथदिवे एलईडी, या सगळ्या व्हिजनसह आम्ही पुढे जातोय. स्वच्छतेवरही फोकस राहायला हवा. अर्बन प्लानिंगशी जोडलेल्या सगळ्या गोष्टींशी जोडलेलं असलं पाहिजे. प्रदूषणातून मुक्ती, कच्च्या तेलाची निर्भरता कमी करणं, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी इथेनॉलवर भर देतोय. पुण्यातही यासाठी प्रयत्न सुरु केलेत. इथल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही त्यांचा फायदा होणार आहे. पालिकेनं अनेक कामं सुरु केली आहेत.

संबंधित बातम्या:

‘आज पुण्याच्या स्वप्नपूर्तीचा दिवस, पुण्याची स्वत:ची मेट्रो धावली’ – देवेंद्र फडणवीस

नागपूरची मेट्रो वेगाने झाली, पिंपरी-ठाणेसाठी मदत करा; अजित पवारांची मोदींना राजकारण न करण्याची ग्वाही

Video | पंतप्रधान मोदींचा दिव्यांगांसोबत तिकीट काढून पुणे मेट्रो प्रवास; दिलखुलास गप्पांचा फडही रंगला…!

Follow Us
पुणे महापालिकेची अतिक्रमणांवर कारवाई; रामेश्वरम कॅफेवरही हातोडा
पुणे महापालिकेची अतिक्रमणांवर कारवाई; रामेश्वरम कॅफेवरही हातोडा.
ठरलं! मुंबईत मनसे, ठाकरे गट पुन्हा एकत्र, तणाव संपला, मनसेला मोठं पद
ठरलं! मुंबईत मनसे, ठाकरे गट पुन्हा एकत्र, तणाव संपला, मनसेला मोठं पद.
अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा द्राक्ष निर्यातीवर परिणाम नाही
अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा द्राक्ष निर्यातीवर परिणाम नाही.
युद्धामुळे अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी उपाययोजना सुरू
युद्धामुळे अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी उपाययोजना सुरू.
महाविकास आघाडीचा राज्यसभा उमेदवार आज ठरवणार – विजय वडेट्टीवार
महाविकास आघाडीचा राज्यसभा उमेदवार आज ठरवणार – विजय वडेट्टीवार.
दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण नाहीच?; नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?
दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण नाहीच?; नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?.
शरद पवार यांची प्रकृती सुधारली; ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवार यांची प्रकृती सुधारली; ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज.
अमेरिका-इराण तणावाचा फटका; जळगावची केळी निर्यात ठप्प, शेतकरी संकटात
अमेरिका-इराण तणावाचा फटका; जळगावची केळी निर्यात ठप्प, शेतकरी संकटात.
ठाकरे बंधूंच्या युतीतील तणावानंतर संजय राऊत 'शिवतीर्थ'वर!
ठाकरे बंधूंच्या युतीतील तणावानंतर संजय राऊत 'शिवतीर्थ'वर!.
...तर शिंदेंचं विमान इराणने पाडलं असतं! रोहित पवारांचा मोठा दावा
...तर शिंदेंचं विमान इराणने पाडलं असतं! रोहित पवारांचा मोठा दावा.