PM Modi Pune Visit: असा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा; दौऱ्यात काय काय होणार?

PM Modi Pune Visit: पुण्यामधील कार्यक्रम हा राजकीय नाही. असं जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी म्हंटलं. पुण्यामध्ये मोदी यांचा उद्या कार्यक्रम होणार आहे. यात वाद काय आहे तेही आपण पाहुया.

PM Modi Pune Visit: असा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा; दौऱ्यात काय काय होणार?
Follow us
| Updated on: Jul 31, 2023 | 7:36 PM

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या पुणे दौरा आहे. या दौऱ्यात मोदी यांना टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार प्रमुख पाहुणे असतील. यावरून आता वाद सुरू झाला. नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला शरद पवार यांनी जाऊ नये. अशी जनतेची भावना असल्याचं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं. शरद पवार यांच्या भूमिकेविषयी संभ्रम असल्याचं पाहायला मिळतं, असं संजय राऊत म्हणाले. तर पुण्यामधील कार्यक्रम हा राजकीय नाही. असं जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी म्हंटलं. पुण्यामध्ये मोदी यांचा उद्या कार्यक्रम होणार आहे. यात वाद काय आहे तेही आपण पाहुया.

कार्यक्रम काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या पुढाकाराने

पुण्यात टिळक पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान होणार आहे. प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राहणार आहेत. ज्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम होतो ते रोहित टिळक आहेत काँग्रेसचे. दुसरीकडे मणिपूर प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते पुणे दौऱ्याचा विरोध करणार आहेत.

असा होता टिळक कुटुंबीयांचा आग्रह

विशेष म्हणजे शरद पवार यांनी या कार्यक्रमाला यावं, असा निरोप खुद्ध शरद पवार यांनी दिला. दोन महिन्यांपूर्वी टिळक कुटुंबानं तशी विनंती नरेंद्र मोदी यांना केली होती. कार्यक्रमाचे अध्यक्षपद शरद पवार यांनी स्वीकारावं, असाही टिळक कुटुंबीयांचा आग्रह होता. दोन महिन्यांपूर्वी कार्यक्रम ठरल्याने शरद पवार कार्यक्रमाला उपस्थित राहतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आली.

असा असेल पंतप्रधान मोदी यांचा दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सकाळी सव्वादहा वाजता पुणे विमानतळावर आगमन होईल. १०.४० मिनिटांनी मोदी हेलिकॅप्टरद्वारे कृषी महाविद्यालयात येतील. सकाळी ११ वाजता मोदी यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा केली जाईल. ११.४५ मिनिटांनी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचं वितरण केलं जाईल. १२.४५ मिनिटांनी मोदी २ मेट्रो मार्गांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांचं लोकार्पण केलं जाईल.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान होणार आहे. लोकमान्य टिळक संस्थेतर्फे पंतप्रधान मोदींना उद्या गौरवण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट आणि टिळक स्वराज्य संघ करणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सन्मान करणार आहेत. लोकमान्य टिळक स्मारक समितीचे अध्यक्ष दीपक जयंत टिळक यांच्या हस्ते नरेंद्र मोदींचा सन्मान होणार आहे. कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार देखील उपस्थित राहणार आहेत.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.