AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभेच्या 10 ते 12 जागांसाठी अजित पवार आग्रही; बारामतीसह ‘या’ जागांवर राष्ट्रवादीचा दावा

NCP Leader Ajit Pawar claim on Baramati Loksabha Election 2024 : महायुतीचं जागावाटप कधी?; अजित पवार यांच्याकडून कोणत्या जागांसाठी आग्रह? अजित पवार किती जागांसाठी आग्रही... कोणते आहेत हे मतदारसंघ... बारामती लोकसभेसोबतच इतरही जागांवर अजिदादांचा दावा... वाचा...

लोकसभेच्या 10 ते 12 जागांसाठी अजित पवार आग्रही; बारामतीसह 'या' जागांवर राष्ट्रवादीचा दावा
| Updated on: Mar 04, 2024 | 10:39 AM
Share

योगेश बोरसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 04 मार्च 2024 : लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आहे. अशात जागा वाटपाचा मुद्दा चर्चेत आहे. राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर झालेलं नाही. भाजपकडून 195 उमेदवाराच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्रातील जागा वाटपावर अद्याप चर्चा सुरु आहे. अशात अजित पवार यांच्या गटाकडून काही जागांसाठी आग्रह धरला जात आहे. बारामतीसह 12 जागांवर अजित पवार गटाकडून दावा सांगितला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

कोणत्या जागांसाठी अजित पवार गट आग्रही?

बारामती, रायगड, सातारा, शिरूर या राष्ट्रवादीकडे असणाऱ्या जागांसाठी अजित पवार गट आग्रही आहे. तर शिंदे गटाकडे असणाऱ्या बुलढाणा, हिंगोली जागा लढण्यासाठी अजित पवार गट इच्छुक आहे. भाजपकडच्या गडचिरोली, माढा या जागांची मागणी अजित पवार करत आहेत. शिवाय धाराशिव परभणी या ठाकरे गटाकडे असणाऱ्या जागांवरही अजित पवार गटाने दावा केलाय.

अजित पवार आज शिरूरमध्ये…

शिरुरचे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार अशोक पवारांच्या होमपिचवर अजित पवारांची टोफ आज धडाडणार आहे. शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा इथं अजित पवार यांचा शेतकरी मेळावा होत आहे. मांडवगण फराटा इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सहा जेसीबींमधून पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात येणार आहे.

महायुतीची पुण्यात बैठक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज महायुतीची महत्त्वाची बैठक होत आहे. मंत्री चंद्रकांत पाटील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. बारामती, शिरूर, आणि पुणे या 3 लोकसभा मतदार संघासाठी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पुण्यात होणार आहे. महायुतीतले सर्व घटक पक्ष बैठकीला हजर राहणार आहेत. सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत चंद्रकांत पाटील चर्चा करणार आहेत. तिन्ही लोकसभा मतदारसंघांचा चंद्रकांत पाटील आढावा घेत वरिष्ठांना अहवाल देणार आहेत.

कोण उपस्थित राहणार?

आज दुपारी बारा वाजल्यापासून पुण्यातील भाजप मुख्य कार्यालयात बैठक सुरु होणार आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून महायुतीतल्या घटक पक्षांच्या सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांना चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करणार आहेत. भाजप, शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(अजित पवार),आरपीआय, शेतकरी संघटना, लोक जनशक्ती पार्टी, शिवसंग्राम या पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित असतील.

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.