Pune : पत्नीच्या अपहरणाचा कट फसला; पतीसह तिघांना चंदननगर पोलिसांनी केली अटक

पत्नीचे अपहरण (Abduction) करणाऱ्याच्या मुसक्या पोलिसांनी (Police) आवळल्या आहेत. संबंधित पती पत्नीपासून वेगळा राहतो. आपल्या इतर तीन साथीदारांच्या मदतीने आपल्या पत्नीला कारमधून घेऊन जात असताना चंदननगर (Chandan Nagar) पोलिसांनी त्यांना फलटणजवळ ताब्यात घेतले.

Pune : पत्नीच्या अपहरणाचा कट फसला; पतीसह तिघांना चंदननगर पोलिसांनी केली अटक
पैशासाठी आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून इंटरनेटवर टाकणाऱ्या प्रेमी युगुलाला तुरुंगवासाची शिक्षाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 12:23 PM

पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचे अपहरण (Abduction) करणाऱ्याच्या मुसक्या पोलिसांनी (Police) आवळल्या आहेत. संबंधित पती पत्नीपासून वेगळा राहतो. आपल्या इतर तीन साथीदारांच्या मदतीने आपल्या पत्नीला कारमधून घेऊन जात असताना चंदननगर (Chandan Nagar) पोलिसांनी त्यांना फलटणजवळ ताब्यात घेतले. अमोल देवराव खोसे (वय 24, रा. रोहिना, ता. परतूर, जि. जालना), महादेव निवृत्ती खानापुरे (वय 22, रा. बामणी, ता. परतूर, जि. जालना) आणि ज्ञानेश्वर बबन पांजगे (वय 25, रा. परतूर, जि. जालना) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 26 वर्षीय महिलेने चंदननगर पोलिसांत फिर्याद दिली आहे. मारवेल झपायर सोसायटीसमोर बुधवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. या आरोपींचा पाठलाग करत चंदननगर पोलिसांनी केवळ सहा तासांच आरोपींना अटक करून महिलेची सुटका केली.

जबरदस्तीने कारमध्ये बसवले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही पतीपासून वेगळी राहते. काम आटोपून फिर्यादी या घरी जात होत्या. त्या खराडीतल्या मारवेल झपायर सोसायटीसमोर आल्या असता, कारमधून आलेल्या आरोपींनी त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवले. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एकाकडे या महिलेने आपला मोबाइल टाकला तसेच आपल्याला पळवून नेले जात असल्याचे ओरडून सांगितले. त्यानंतर मोबाइल घेणाऱ्या नागरिकाने चंदननगर पोलिसांत धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला.

महिलेची सुटका

पोलिसांनी तातडीने महिलेचा शोध सुरू केला. कार फलटणच्या दिशेने जात असल्याची माहिती त्यांना मिळाली. चंदननगर पोलिसांचे पथक रवाना होत त्यांनी सहा तासांत आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली. तर महिलेची सुटका केली.

आणखी वाचा :

Pune Spa : औंधमधल्या स्पा सेंटरमध्ये अवैध धंदे! पोलिसांनी केला पर्दाफाश, व्यवस्थापकाला बेड्या

Pune murder : डोक्यात दगड घालून रांजणगावात मित्राची हत्या; पोलिसांनी दोन तासांत आवळल्या आरोपीच्या मुसक्या

Pune crime : मूत्रपिंड प्रत्यारोपण फसवणूक करून रुग्णाच्या जीवाशी खेळ! ‘ससून’च्या अधीक्षकांचं निलंबन

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.