AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधींच्या दौऱ्यावेळी काँग्रेसकडून विधानसभेच्या जागांची मागणी; राष्ट्रवादीच्या जागांवरही दावा

Congress About Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीआधी राहुल गांधी हे महाराष्ट्रात येत आहेत. आज ते नांदेड आणि कोल्हापूरमध्ये असणार आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या स्थानिक लोकांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारीची मागणी केली आहे. वाचा सविस्तर...

राहुल गांधींच्या दौऱ्यावेळी काँग्रेसकडून विधानसभेच्या जागांची मागणी; राष्ट्रवादीच्या जागांवरही दावा
राहुल गांधीImage Credit source: Facebook
| Updated on: Sep 05, 2024 | 10:44 AM
Share

काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आज महाराष्ट्रात येत आहेत. नांदेड आणि कोल्हापूरमध्ये राहुल गांधी यांचा दौरा आहे. नांदेडमध्ये दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या घरी जात कुटुंबियांची भेट घेणार आहेत. त्यानंतर राहुल गांधी कोल्हापूरकडे रवाना होणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसमधील नेत्यांनी विधानसभा निवडणुकीचं समीकरण मांडलं आहे. महत्वाच्या मतदारसंघांवर काँग्रेसने दावा केला आहे. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसने जास्तीत जास्त जागा लढवाव्यात, अशी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचं म्हणणं आहे. पुण्यातील राष्ट्रवादीकडे असणाऱ्या दोन जागांवरही काँग्रेसने दावा केला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्रासाठीची बैठक पार पडली. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला चांगले दिवस आहेत. त्यांना जास्तीत जास्त जागा द्या, अशी मागणी स्थानिक नेत्यांनी काँग्रेस वरिष्ठांकडे केली आहे. कोल्हापूरमध्ये सहा, साताऱ्यात तीन, सोलापूरमध्ये तीन तर पुण्यात सहा जागा काँग्रेसकडे दिल्या जाव्यात, असं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे.

पुण्यातील कोणत्या जागांवर दावा

पुणे शहर काँग्रेसने पुणे शहरातील पाच विधानसभा मतदारसंघाची पक्षाकडे मागणी केली आहे. काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठकीत मागणी केली आहे. काँग्रेसकडे याधीच शहरातील तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये कसबा, शिवाजीनगर आणि कॅन्टोन्मेंट या मतदारसंघाचा समावेश आहे. मात्र हडपसर आणि पर्वती हे दोन्ही राष्ट्रवादीचे मतदारसंघही काँग्रेसकडे घेण्याची शहर काँग्रेस नेत्यांची मागणी आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याकडे ही मागणी केली आहे.

राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर

राहुल गांधी आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दिवंगत पतंगराव कदम यांच्या पूर्णकृती पुतळ्याचं उद्घाटन पार पडतंय. मल्लिकार्जुन खर्गे , शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज हा उद्घाटन कार्यक्रम पार पडतोय. सोनहिरा कारखाना स्थळावर या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं आहे. राहुल गांधी यांचं 11 वाजता कारखाना स्थळावर आगमन होणार आहे. सांगलीतील कडेगावमध्ये जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.