AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune rain : पाऊस गणेशभक्तांना भिजवणार? मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा पुणे वेधशाळेनं वर्तवला अंदाज

पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, कारण पुढील 3-4 दिवसांत वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो, असे वेधशाळेने म्हटले आहे.

Pune rain : पाऊस गणेशभक्तांना भिजवणार? मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा पुणे वेधशाळेनं वर्तवला अंदाज
पुणे पाऊस, संग्रहित छायाचित्रImage Credit source: tv9
| Updated on: Sep 09, 2022 | 1:02 PM
Share

पुणे : मध्यम ते तीव्र स्वरुपाचा पाऊस (Heavy rain) आज पुण्यात हजेरी लावणार, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. आज गणपती विसर्जन (Ganesh Immersion) आहे. त्यामुळे रस्ते गणेशभक्तांनी फुललेले दिसून येत आहेत. या गणेशभक्तांना आज पाऊस भिजवणार असल्याचा या पावसाचा अंदाज आधीच पुण्याच्या हवामान विभागाने (India Meteorological Department) वर्तवला होता. मध्यम ते मुसळधार असे पावसाचे स्वरूप असणार आहे. 24 तासांच्या कालावधीत 50-64 मिमीपर्यंत म्हणजेच मध्यमपेक्षा अधिक पाऊस पडणार आहे. पुढील काही दिवसांत पाऊस प्रामुख्याने संवहनी स्वरूपाचा असेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, नागरिकांनी अशा वातावरणात योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. पावसाचा पॅटर्न ठराविक मान्सूनसारखा नाही. दिवसा उच्च तापमान, मेघगर्जनेचे ढग तयार करणे अशा स्वरुपाचा तो असेल. काही दिवस पाऊस मध्यमपेक्षा वरच्या मर्यादेपर्यंत पोहोचू शकतो, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

‘येत्या दोन-तीन दिवसांत मुसळधार ते अति मुसळधार’

शहर, जिल्ह्यातील घाट माथ्याच्या भागात येत्या दोन-तीन दिवसांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. धरणे जवळजवळ भरली आहेत. त्यामुळे अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे, असे हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी म्हटले आहे.

ऑरेंज अलर्ट जारी

पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, कारण पुढील 3-4 दिवसांत वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो. मध्यम तीव्र सरींमुळे, गणेशमूर्तींचे विसर्जन होणार असलेल्या जलकुंभांमध्ये आणि आजूबाजूलाही रस्ते निसरडे, चिखलमय होण्याची शक्यता आहे, असे कश्यपी म्हणाले.

‘पाणी साचण्याचा गंभीर धोका’

जोरदार पावसामुळे रस्त्यालगतची झाडेही उन्मळून पडू शकतात. तर पाणी साचण्याचा गंभीर धोका आहे. सखल भागात पाणी साचण्याच्या घटनांसह तात्पुरत्या पूरपरिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. पावसामुळे आधीच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. तर येणाऱ्या पावसामुळे त्यात आणखी भर पडू शकते. त्यामुळे लोकांनी वाहने काळजीपूर्वक चालवावीत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.