पुण्यातील अ‍ॅमेनिटी स्पेसच्या मुद्यावरुन भाजपची माघार; हा तर पुणेकरांचा विजय, राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

पुणे शहरातील महापालिकेच्या ताब्यातील अ‍ॅमेनिटी स्पेस भाडेतत्वावर देण्याबाबत अखेर सत्ताधारी भाजपची माघार घेतलीय. या निर्णयास विरोधी पक्षांसह सामाजिक संघटनांनी तीव्र विरोध केल्यानंतर आज होणाऱ्या मुख्यसभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी न आणण्याचा निर्णय भाजपने घेतलाय.

पुण्यातील अ‍ॅमेनिटी स्पेसच्या मुद्यावरुन भाजपची माघार; हा तर पुणेकरांचा विजय, राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
मुरलीधर मोहोळ प्रशांत जगताप
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 1:29 PM

पुणे: पुण्यात गेल्या दोन महिन्यांपासून अ‍ॅमेनिटी स्पेस भाड्यानं देण्याचा मुद्दा गाजत होता. पुण्यातील सत्ताधारी भाजप अ‍ॅमेनिटी स्पेस भाड्यानं देण्यासाठी आग्रही होता. भाजपच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका गटानं भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. महापालिकेच्या सभेपूर्वी राष्ट्रवादीनं भूमिका बदलल्यानं भाजपला प्रस्ताव सादर करता आला नव्हता. आता अ‍ॅमेनिटी स्पेस भाड्यानं न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

पुण्याचे महापौर काय म्हणाले?

पुणे शहरातील महापालिकेच्या ताब्यातील अ‍ॅमेनिटी स्पेस भाडेतत्वावर देण्याबाबत अखेर सत्ताधारी भाजपची माघार घेतलीय. या निर्णयास विरोधी पक्षांसह सामाजिक संघटनांनी तीव्र विरोध केल्यानंतर आज होणाऱ्या मुख्यसभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी न आणण्याचा निर्णय भाजपने घेतलाय. याबाबत घाईघाईने कोणताही निर्णय न घेता पुणेकरांसह, सामाजिक संस्था, नागरिक सर्वांना एकत्र विश्वासात घेऊन आम्ही अ‍ॅमेनिटी स्पेस भाडेतत्वावर न देण्याचा निर्णय आम्ही घेणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केलं.

हा तर पुणेकरांचा विजय, राष्ट्रवादीची प्रतिक्रिया

पुणे महानगरपालिकेतील पाशवी बहुमताच्या जोरावर मनमानी कारभार करणाऱ्या सत्ताधारी भाजपला अखेर पुणेकरांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधासमोर झुकावे लागले असून, दीर्घ मुदतीच्या कराराने 185 ॲमेनिटी स्पेस भाड्याने देण्याचा निर्णय स्थगित करून पुढे ढकलावा लागला आहे. हा पुणेकरांचा विजय तर आहेच, शिवाय महानगरपालिकेची मालकी असलेल्या आणि सर्वसामान्य पुणेकरांच्या हक्काच्या जमिनी धनदांडग्यांच्या घशात घालण्याच्या भाजपच्या प्रयत्नाला लगावलेली जोरदार चपराक आहे. विघ्नहर्ता गजाननाने भाजपला उशिरा का होईना सद्बुद्धी दिली असून, त्यामुळे पुणेकरांवर भाजपमुळे येऊ घातलेले एक विघ्न टळले आहे, असा टोला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी लगावलाय.

राष्ट्रवादीच्या शहर प्रमुखांचं चंद्रकात पाटलांवर टीकास्त्र

पुणे महानगरपालिकेच्या मालकीच्या असलेल्या आणि ॲमेनिटी स्पेससाठी राखीव जागा दीर्घ मुदतीच्या कराराने भाड्याने देण्याचा म्हणजेच एक प्रकारे या मालमत्तांच्या विक्रीचा घाट सत्ताधारी भाजपने घातला होता. विशेष म्हणजे, ज्या 185 ॲमेनिटी स्पेस भाजपने विक्रीस काढल्या होत्या, त्यात सर्वाधिक 74 ॲमेनिटी स्पेस या कोथरूड विधानसभा मतदारसंघातील होत्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रतिनिधित्व करीत असलेल्या या मतदारसंघातील सर्वाधिक ॲमेनिटी स्पेस या चंद्रकांत पाटील यांच्या परवानगीनेच विक्रीस काढल्याचाही आमचा दावा होता. अखेर, तो दावा खरा निघाला आहे. जिथे प्रतिनिधित्व करण्यासाठी आले, ज्या मतदारांनी मोठ्या अपेक्षांनी निवडून दिले, त्या मतदारांच्या हक्काच्या जागा लाटण्याचाच हा प्रकार समोर आला होता. या निर्णयामागे दडलेले काळेबेरे हळूहळू राष्ट्रवादी काँग्रेसकडून चव्हाट्यावर आणले जात असल्यानेच अखेर चंद्रकांत पाटील आणि महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांना हा निर्णय स्थगित करावा लागला, यात काही शंका नाही, असेही जगताप म्हणाले.

इतर बातम्या:

‘मुका’ घेण्याचं वक्तव्य महागात, रुपाली चाकणकर यांची प्रवीण दरेकरांविरोधात पोलिसात तक्रार

ना राज्यपालांवर बोलले, ना सोमय्यांवर, पवार थेट ललित मोदींवर बोलले! नेमके काय म्हणाले? वाचा सविस्तर

Pune Municipal Corporation Mayor Muralidhar Mohol said they take back proposal of Amenity Space on rent developer

Non Stop LIVE Update
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.