Pune Nashik Railway | पुणे-नाशिक रेल्वेचा मार्ग आता शिर्डीवरुन, का बदलला मार्ग

pune nashik semi high speed railway News | पुणे-नाशिक दरम्यान सध्या रेल्वेमार्ग नाही. या मार्गावर सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्याची घोषणाही झाली होती. परंतु आता या रेल्वेचा मार्ग बदलण्यात आला आहे.

Pune Nashik Railway | पुणे-नाशिक रेल्वेचा मार्ग आता शिर्डीवरुन, का बदलला मार्ग
Follow us
| Updated on: Feb 16, 2024 | 7:20 AM

पुणे, दि. 11 फेब्रुवारी 2024 | पुणे आणि नाशिक ही राज्यातील दोन महत्वाची शहरे आहेत. परंतु ही दोन्ही शहरे अजूनही रेल्वे मार्गाने जोडली गेली नाही. या शहरांमध्ये प्रवास करण्यासाठी फक्त रस्ते मार्गच आहे. यामुळे ही दोन्ही शहरे रेल्वे जोडण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. हा मार्ग तयार करण्याची जबाबदारी महारेलकडे देण्यात आली. या मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. यामार्गासाठी नुकतेच 2500 कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली होती. परंतु या मार्गात अजून एक महत्वाचा बदल झाला आहे. नाशिक पुणे रेल्वे मार्ग 235 किलोमीटरचा आहे. त्याचा मार्गच बदलला आहे. आता हा मार्ग 33 किलोमीटरने वाढणार आहे. त्याला शिर्डी जोडले जाईल, असा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. या मार्गावर 12 ते 16 कोचची रेल्वे धावणार आहे. ही रेल्वे सेमी हायस्पीड असणार आहे.

का केला बदल फडणवीस यांनी सांगितले

नाशिक-पुणे रेल्‍वेमार्गाबाबत रेल्‍वमंत्र्यांशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. सध्या हा मार्ग 235 किलोमीटरचा आहे. विद्यामान मार्गावर एकूण 20 स्टेशन आहे. 18 बोगदे आणि 19 उड्डाणपुल आहे. परंतु या मार्गावरील बोगद्यांमुळे प्रकल्‍पाचा खर्चात मोठी वाढ होणार आहे. यामुळे नाशिक-शिर्डी-पुणे अशा पर्याय तयार केला जात आहे. आता रेल्‍वेमार्गाबाबत रेल्‍वे मंत्रालयाकडून विचार सुरू असल्‍याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हा मार्ग बदलाणार असल्यामुळे त्याचे अंतर 33 किलोमीटरने वाढणार आहे.

हे सुद्धा वाचा

मार्ग वाढणार, पण असा फायदा होणार

नाशिक-शिर्डी-पुणे असा हा रेल्वे मार्ग होणार आहे. या मार्गाचा फायदा नाशिक, पुणे शहरासोबत शिर्डी शहरादेखील होणार आहे. यामुळे या नवीन मार्गाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर लवकरच मंजुरीसाठी सादर केला होईल. हा मार्ग पूर्ण झाल्यावर नाशिक-पुणे अंतर दोन तासांत गाठणे शक्य होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.