AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे पोलिसांनी ‘आई’ नावावरुन लावला गुन्हेगाराचा छडा, चार लाखांच्या लूट प्रकरणात ठोकल्या बेड्या

Pune Crime News : पुणे शहरात चार दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचा तपास लागला आहे. एका छोट्या धाग्यावरुन पोलीस आरोपीपर्यंत पोहचले आहे. चार लाखांच्या लूट प्रकरणातील आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

पुणे पोलिसांनी 'आई' नावावरुन लावला गुन्हेगाराचा छडा, चार लाखांच्या लूट प्रकरणात ठोकल्या बेड्या
Pune PoliceImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 23, 2023 | 11:40 AM
Share

पुणे | 23 जुलै 2023 : गुन्हेगार किती हुशार असला तरी गुन्हा करताना काही तरी पुरावा सोडून जातो. गुन्हेगारापेक्षाही पुढचा विचार पोलीस नेहमी करतात. त्यामुळे अनेक फरार गुन्हेगारसुद्धा पोलिसांच्या सापळ्यात येतात. पुणे शहरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या लूट प्रकरणात पोलिसांनी गुन्हेगाराचा छडा लावला आहे. ‘आई’ या नावामुळे पोलिसांना गुन्हगाराचा छडा लागला आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीच्या इतर दोन साथीदारांचा शोध सुरु आहे.

काय झाला होता प्रकार

पुणे शहरातील तंबाखू व्यापारी लतेश सुरतवाला हे १९ जुलै रोजी आपल्या दुकानातून घरी जात होते. यावेळी गणेश क्रीडा मंचाजवळ दुचाकीवर आलेल्या तिघांनी पिस्तुलीतून गोळीबार करत लूट केली. या घटनेत त्यांचे चार लाख रुपये गेले आणि ते जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल झाला होता.

कसा पकडला आरोपी

पोलिसांनी स.प.महाविद्यालयाजवळ असलेल्या गणेश क्रीडा मंचाजवळ असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी हल्लेखारांची दुचाकीवर “आई” हे नाव लिहिलेले दिसले. या धाग्यावरुन पर्वती पोलीस आरोपींपर्यंत पोहचले. त्यांनी सूरज वाघमोडे (वय २१) या आरोपीला अटक केली. त्याच्यासोबत असलेले दोन साथीदार पळून गेले आहे. सूरज हा मार्केट यार्डमध्ये हमाली काम करतो. त्यानेच इतर दोघांना एक गेम करायचे आहे, असे सांगत सोबत घेतले होते. परंतु पोलीस त्यांच्यापर्यंत पोहचले. एका धाग्यावरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा तपास केला आहे.

ही कामगिरी निरीक्षक विजय खोमणे, उपनिरीक्षक सुनील जगदाळे, अंमलदार कुंदन शिंदे, अमित सुर्वे, प्रकाश मरगजे, नवनाथ भोसले, दयानंद तेलंगे पाटील, प्रशांत शिंदे, किशोर वळे, अनिल तांबोळी यांनी केली.

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.