pooja chavan suicide case | राज्यात तीन पथकांकडून चौकशी, तपास अहवाल पोलीस महासंचालकांकडे सादर

pooja chavan suicide case | राज्यात तीन पथकांकडून चौकशी, तपास अहवाल पोलीस महासंचालकांकडे सादर
पूजा चव्हाण

पुणे पोलिसांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे आपला अहवाल सादर केला आहे. (police submitted report pooja chavan suicide case)

prajwal dhage

|

Feb 17, 2021 | 4:10 PM

पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या (pooja chavan suicide) प्रकरणात मागील काही दिवसांपासून अनके नवनव्या गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathore) यांचे नाव समोर आल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. विरोधकांनी राठोड यांचा राजीनामा घेण्याची मागणी करत पोलीस निष्पक्षपणे चौकशी करत नसल्याचा आरोप केलेला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी या प्रकरणी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे तपास अहवाल सादर केलाय. (Pune police has submitted detail report of pooja chavan suicide case to Director General of Police)

अहवाल सादर, अद्याप कोणालाही अटक नाही

पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात काही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्या. या रेकॉर्डिंगमधील आवाज हा संजय राठोड यांचाच आहे, असा दावा भाजपने केलेला आहे. त्यामुळे पूजाच्या आत्महत्या प्रकरणात निष्षक्ष चौकशी करुन राठोड यांची हकालपट्टी करा, अशी मागणी भाजपने लावून धरलेली आहे. भाजप नेते चित्रा वाघ, भाजप नेते अतुल भातखळकर या नेत्यांनी महाविकास आघाडीचे सरकार आणि पोलिसांना थेट लक्ष्य करत, राठोड यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला होता. तसेच, पोलीस या प्रकरणी निष्पक्षपणे तपास करत नसल्याचेही भाजपने म्हटले होते. या पार्श्वभूमीवर पोलीसांनी एक अहवाल सादर केला आहे. अहवालाच्या प्रति राज्याचे पोलीस महासंचलक तसेच राष्ट्रीय महिला आयोगाला पाठवण्यात आल्या आहेत. मात्र, असे असले तरी या प्रकरणात अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेलं नसल्याचं पुणे पोलिसांनी सांगितलं आहे.

पूजाच्या घरात मद्याच्या बॉटल

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा पुणे पोलीस तपास करत आहे. पोलिसांनी पूजाच्या घराची तपासणी केली असता तिच्या घरात मद्याच्या 4 बाटल्या सापडल्या. त्यातील अडीच बाटल्या रिकाम्या होत्या. त्यावरून घरातील व्यक्तींनी मद्य प्राशन केल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र, पूजाने मद्य प्रशान केले होते की नाही या बाबतचा अद्याप उलगडा झालेला नाही. परंतु, मद्याच्या बाटल्या सापडल्याने पूजाचा मद्याच्या नशेत गॅलरीतून तोल तर गेला नाही ना? किंवा तिला नशेत कुणी ढकलून तर दिले नाही ना? असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी यबाबतच्या कोणत्याही बाबींना दुजोरा दिला नाही, मात्र त्या दिशेने तपास सुरू केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

राज्यात तीन पथकांकडून तपास

दरम्यान, या प्रकरणात पोलीस निष्पक्षपणे तपास करत नसल्याचा आरोप विरोधकांकडून होत असला तरी, राज्यात एकूण तीन पथकांकडून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात तपास सुरु आहे. ही तिन्ही पथकं राज्यातल्या वेगवेगळ्या भागात तपास करत आहेत.

इतर बातम्या :

Pooja Chavan Suicide Case Live Updates : कोणावरही अन्याय होणार नाही, सत्य बाहेर येईल : मुख्यमंत्री

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें