AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

pune auto rickshaw | रात्रीच्या अंधारात रिक्षा विहिरीत पडली, सकाळी राबवले रेस्क्यू, तिघांचा मृत्यू

pune auto rickshaw | पुणे जिल्ह्यात सोमवारी रात्री मोठा अपघात झाला आहे. रात्रीच्या अंधारात रिक्षाच विहिरीत पडली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

pune auto rickshaw | रात्रीच्या अंधारात रिक्षा विहिरीत पडली, सकाळी राबवले रेस्क्यू, तिघांचा मृत्यू
| Updated on: Sep 26, 2023 | 1:14 PM
Share

पुणे | 26 सप्टेंबर 2023 : पुणे शहर आणि जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. महामार्गावर अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे. हे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचवेळी पुणे शहर आणि जिल्ह्यात ब्लॅक स्पॉट शोधण्यात आले आहे. त्याठिकाणी अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. आता पुणे जिल्ह्यातील पालखी मार्गावर मोठा अपघात झाला आहे. रात्रीच्या अंधारात रिक्षाच प्रवाशांसह विहिरीत पडली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.

कसा झाला अपघात

सासवड – जेजुरी पालखी महामार्गावर खळद बोरावके मळा येथे सोमवारी रात्रीच्या वेळेस अपघात झाला. या मार्गावरुन जाणारी रिक्षा (क्रमांक एमएच 12 क्यूई 7706) ही विहिरीत पडली. रिक्षेतून प्रवासी प्रवास करत होते. त्यात दोन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या एका दाम्पत्याचा समावेश होता. विहिरीत पडलेल्या दोघांना जीवंत रेस्क्यू टीमने सकाळीच बाहेर काढले.

तिघांचा शोधण्यासाठी रेस्क्यू

रिक्षेतून दोघांना जिवंत काढण्यात आल्यानंतर अजून तीन जण अजूनही विहिरीत अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीमने पुन्हा बचावकार्य सुरु केले. त्यानंतर तिघांचा मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत बाहेर काढण्यात आले. या तिघांचा मृत्यू झाला. त्यामध्ये एक पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे. मृतांची ओळख पटली असून शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. मृत व्यक्ती सर्व एकाच कुटुंबातील आहे. जखमींना सासवडच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नवविवाहित दाम्पत्य पडले विहिरीत

दोन दिवसांपूर्वी लग्न झालेले एक नवविवाहित दाम्पत्य रिक्षेतून प्रवास करत होते. अपघातात ते ही विहिरीत पडले. श्रावणी संदीप शेलार (वय 17), रोहित विलास शेलार (वय 23), वैष्णवी रोहित शेलार (वय 18 ) या तिघांचा मृत्यू झाला आहे.लग्नानंतर नवदाम्पत्य देवदर्शनाला जेजुरीला जात होते. परंतु संसाराला सुरुवात होण्यापूर्वीच या नवदांम्पत्याचा अंत झाला. आदित्य मधुकर घोलप (वय 22), शितल संदीप शेलार (वय 35) हे जखमी झाले आहेत. सर्व जण पुणे शहरातील रहिवाशी आहे. भोर उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव आणि रेस्क्यू टीमकडून यासाठी प्रयत्न केले. या घटनेचा पोलिसांनी सुरु केला आहे. त्यानंतर अपघात कसा झाला हे स्पष्ट होणार आहे.

हे ही वाचा

दोन दिवसांपूर्वी लग्न झाले, दाम्पत्य रिक्षेने जात होते, रिक्षा विहिरीत पडली अन्…

म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.