पुण्यातील वशाटोत्सव रद्द, शरद पवार यांच्या सूचनेनुसार निर्णय

पुण्यात आज (20 फेब्रवारी) होणारा वशाटोत्सव रद्द करण्यात आला आहे. (pune Vashatotsava cancelled corona pandemic)

पुण्यातील वशाटोत्सव रद्द, शरद पवार यांच्या सूचनेनुसार निर्णय
वशाटोत्सव रद्द

पुणे : पुण्यात आज (20 फेब्रवारी) होणारा वशाटोत्सव रद्द करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह राज्यातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार होते. मात्र, कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर त्यांच्याच सूचनेनुसार हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वशाटोत्सवाच्या आयोजकांनी सांगितले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. (pune Vashatotsava been cancelled due to corona pandemic)

राज्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात वशाटोत्सवाचे आयोजन केले होते. नियोजित कार्यक्रमापत्रिकेनुसार या कार्यक्रमाची सुरुवात आज (20 फेब्रवारी) होणार होती. मात्र राज्यात कोरोना संसर्ग वाढू लागला आहे. पुण्यातही कोरोनाचे रुग्ण बऱ्याच प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार वशाटोत्सव रद्द करण्यात आला आहे.

दिग्गज नेत्यांची उपस्थिती

या कार्यक्रमासाठी रसिक दरवर्षी मोठ्या संख्येने अपस्थित असतात. राज्यभरात या वशाटोत्सवाची चर्चा असते. यावेळी या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे या नेत्यांची प्रमुख उपस्थिती राहणार होते. मात्र, कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता हा कार्यक्रम रद्द करण्यात आला असून, तो पुढे ढकलण्यात आला आहे.

संगीत संत तुकाराम नाटक रद्द

विशेष म्हणजे वशाटोत्सवात ‘संगीत संत तुकाराम’ हे नाटक आयोजित करण्यात आलं होतं. मात्र वारकरी संप्रदायातील काही लोकांच्या आक्षेपामुळे वशाटोत्सवात आयोजित हे नाटक रद्द करावं लागलं. पुण्यातील कोथरुडमधील चांदणी लॉन्समध्ये हा कार्यक्रम होणार होता.


इतर बातम्या :

पुण्यात वशाटोत्सवाचं आयोजन, शरद पवार, संजय राऊतांसह आव्हाड-मुंडे उपस्थित राहणार

Video : पावसातल्या सभेला कारणीभूत साहेब नाहीत, तो एक माणूस, सुप्रिया सुळेंनी दीड वर्षांनी गुपित फोडलं

अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना रिपब्लिकन पक्ष संरक्षण देईन : रामदास आठवले

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI