AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नरेंद्र मोदींचं कौतुक, सुनेत्रा पवारांना पाठिंबा अन् संजय राऊतांना आव्हान; विजय शिवतारे नेमकं काय म्हणाले?

Vijay Shivtare on Narendra Modi Sanjay Raut and Loksabha Election 2024 : शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. तसंच संजय राऊत यांनानी शिवतारेंनी आव्हान दिलं आहे. वाचा सविस्तर...

नरेंद्र मोदींचं कौतुक, सुनेत्रा पवारांना पाठिंबा अन् संजय राऊतांना आव्हान; विजय शिवतारे नेमकं काय म्हणाले?
| Updated on: Apr 30, 2024 | 1:27 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचंड लोकप्रियता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा जिकडे असते तिकडे एसपीजीची सुरक्षा कडक असते. सभेच्या बाहेर हजारो लोकं बाहेर होती. पुण्यात मोठी सभा झाली आणि मोदी सिद्ध विकासावर बोललेत. पुणेकर कालच्या सभेवर खुश आहेत. काही विरोधक सभेला लोकं पाठवत असतात, आणि सभेतून उठून जायचं. त्यांचे कॅमेरामन असतात. पुण्यात एक लाख लोकांची सभा, कुणीही घेऊन दाखवावी, असं आव्हान विजय शिवतारे यांनी दिलं विरोधकांना दिलं आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

नरेंद्र मोदींच्या सभेवर भाष्य

कालच्या सभेला उस्फुर्त लोकं आले होते. नरेंद्र मोदींना ऐकण्यासाठी आले होते. नाना पटोले काय बोलतात खोटा आरोप करतात. विरोधकांनी जर आरोप केले नाहीत तर त्यांचं दुकान कशी चालणार, असं म्हणत शिवतारेंनी नाना पटोले यांना प्रत्युत्तर दिलं आहे. भटकती आत्मा हे जनरल वक्तव्य होतं. कुणाला एकाला टार्गेट केलं असं बोलणं चुकीचं आहे. कालपासून भटकती आत्मा असे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. शरद पवारांवर टीका केली असेल, असं म्हणणं चुकीचं आहे, असंही शिवतारे म्हणाले.

राऊतांना आव्हान

सासवडमध्ये जी आमची सभा झाली. हजारो लोकांची गर्दी होती. संजय राऊतांना माझं खुलं आव्हान आहे. तुम्ही रेसकोर्स मैदानावर सभा घेऊन दाखवा. संजय राऊत यांना सिझोफेनियाची लक्षणे दिसतायेत. संजय राऊतांना रात्री स्वप्न पडतात. दुसऱ्या दिवशी काय बोलतात त्यांनाच कळत नाही. सुनेत्रा पवार प्रत्येक मतदारसंघात लीड घेणार आहेत. ही निवडणूक भावकी आणि गावकीची नाही, ही लढाई मोदी आणि राहुल गांधी यांच्यात लढाई आहे, असंही शिवतारे म्हणाले आहेत.

भोरच्या सभेवर म्हणाले…

उद्या संध्याकाळी 6 वाजता भोर मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची मोठी सभा होणार आहे. या सभेच्या माध्यमातून भोर मतदारसंघातील प्रश्न सोडवले जाणार आहेत. वाघोली आणि वारजे या दोन ठिकाणी नितीन गडकरी यांच्या सभा होणार आहेत. अमित शाह यांची एक सभा बारामती लोकसभा मतदारसंघात होणार आहे, अशी माहिती विजय शिवतारे यांनी दिली.

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.