बारामतीत गुरुवारी होणार सायन्स पार्कचे उद्घाटन; शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, गौतम अदानी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

भविष्यात विद्यार्थ्यांना या केंद्रात उपलब्ध असणाऱ्या फन सायन्स गॅलरी, एग्रीकल्चरल गॅलरी, 3डी थिएटर, इनोव्हेशन हब, व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंतेड रिलिटी अशा स्वरूपाचे तंत्रज्ञान येथे पाहायला मिळणार आहे. जपान, कोरिया आणि चीन या देशांमध्ये स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण व्यवस्था आहे.

बारामतीत गुरुवारी होणार सायन्स पार्कचे उद्घाटन; शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, गौतम अदानी यांच्या हस्ते होणार उद्घाटन
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 9:20 PM

पुणे : बारामतीतील (Baramati) ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे (Agricultural Development Trust) कृषी विज्ञान केंद्राच्या आवारात राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजी कमिशन, महाराष्ट्र सरकार आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सायन्स अँड इनोव्हेशन अॅक्टिविटी सेंटर (Science and Innovation Activity Center) उभारण्यात आले आहे. या सायन्स पार्कचे उद्घाटन 16 जून रोजी होणार आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित या कार्यक्रमाचे उद्घघाटन होणार आहे.

राज्यभरात सध्या चर्चिला जात असलेल्या या सायन्स पार्कमध्ये मुलांच्या बौद्धिक कौशल्य व वैज्ञानिक जागृती वाढीसाठी वेगवेगळे प्रकल्प असणार आहेत.

देशात आतापासूनच विद्यार्थी स्वतंत्रपणे जगातील

या माध्यमातून देशात आतापासूनच विद्यार्थी स्वतंत्रपणे जगातील, प्रत्येक कुतूहल असणाऱ्या गोष्टींविषयी आपल्या वेगळ्या सिद्धांताची मांडणी करू शकतील. तसेच त्यांच्यात लहानपणीच वैज्ञानिक वृत्ती वाढीस लागेल अशी माहितीही राजेंद्र पवार यांनी यावेळी दिली.

राज्यातील 127 शाळांना आमंत्रण

कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात हे सायन्स पार्क असून या सायन्स पार्कच्या उद्घाटनाच्यानिमित्ताने 15 व 16 जून रोजी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनदेखील होणार आहे. या विज्ञान प्रदर्शनामध्ये 36 जिल्ह्यातील 250 विविध वैज्ञानिक प्रकल्प सहभागी होणार आहेत. राज्यभरातील 127 शाळांना देखील या ठिकाणी आमंत्रित करण्यात आले आहे.

तज्ज्ञ व्यक्तींचे फन सायन्स शो

या प्रदर्शनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या तज्ज्ञ व्यक्तींचे फन सायन्स शो, जादूचे प्रयोग, विज्ञान कार्यशाळा, स्टँडअप कॉमेडी अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी मुलांसाठी असणार आहे. त्या कार्यक्रमासाठी राज्यभरातून सहा हजार विद्यार्थी व सहाशे शिक्षक येणार आहेत.

तंत्रज्ञानाचा शास्त्रशुद्ध प्रशिक्षण

भविष्यात विद्यार्थ्यांना या केंद्रात उपलब्ध असणाऱ्या फन सायन्स गॅलरी, एग्रीकल्चरल गॅलरी, 3डी थिएटर, इनोव्हेशन हब, व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंतेड रिलिटी अशा स्वरूपाचे तंत्रज्ञान येथे पाहायला मिळणार आहे. जपान, कोरिया आणि चीन या देशांमध्ये स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण व्यवस्था आहे. त्यामुळे तेथील तरुण संशोधक टेलिकॉम, ऑटोमोबाईल, होम अप्लायन्सेस या क्षेत्रात भरीव प्रगती करत आहेत. याचमुळे कोडींग डेटा सायन्स डिजिटल मार्केटिंग डिझाईन थिंकिंग या तंत्रज्ञानाचा शास्त्रशुद्ध प्रशिक्षण या सेंटरमध्ये देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Non Stop LIVE Update
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.