AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरे काही तरी चांगलं बोला; ईडी, आयकराच्या चौकशीवर शरद पवार यांचं सूचक मौन

गेल्या काही दिवसांपासून पवार कुटुंबीयांशी संबंधितांवर आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत. त्याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारलं असता त्यांनी सूचक मौन पाळलं. (sharad pawar no reaction of ed and it department enquiry)

अरे काही तरी चांगलं बोला; ईडी, आयकराच्या चौकशीवर शरद पवार यांचं सूचक मौन
sharad pawar
| Edited By: | Updated on: Nov 05, 2021 | 10:42 AM
Share

पुणे: गेल्या काही दिवसांपासून पवार कुटुंबीयांशी संबंधितांवर आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत. त्याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारलं असता त्यांनी सूचक मौन पाळलं. अरे काही तरी चांगलं बोला, असं म्हणून शरद पवार यांनी हा विषय टाळला. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

शरद पवार यांनी आज दिवाळी निमित्ताने कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. गोविंद बागेतली त्यांच्या घरी कार्यकर्त्यांनी पवारांची भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. यंदाची दिवाळी लोकांना साजरी करता यावी या विचारात आम्ही होतो. त्यामुळे काही निर्णय घेतला. लोकांनी काही सूचना आल्या. आम्ही मास्क लावू, शिस्त पाळू पण दिवाळी साजरी करू द्या अशा सूचना केल्या. नागरिकांनी तशा सूचनाही पाळल्या. या संकटाच्या वर्षातून आपण बाहेर निघत आहोत. आपण नेहमीचा कारभार नेहमीप्रमाणे करू. गेल्या दोन वर्षात झालेलं नुकसान भरून काढू. अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्था आपण सावरू. नव्या दमाने आपण पुन्हा एकदा कामाला लागू असा विश्वास आहे, असं पवार म्हणाले.

अजित पवारांना कोरोनाची लागण?

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार आले नव्हते. त्याबाबत त्यांना विचारण्यात आलं. त्यावर अजित पवार यांना कदाचित कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. तसं डॉक्टरांनी सूचवलं. त्यांच्या सकाळी टेस्टही झाल्या. त्यांचा रिपोर्ट आला नाही. त्यामुळे एढ्या लोकांमध्ये मिसळण्याची रिस्क घेऊ नका असं मी त्यांना सूचवलं. त्यामुळे ते आले नाहीत, असं त्यांनी सांगितलं.

जीएसटीची रक्कम द्या, इंधन दरवाढ कमी करू

केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलची दरवाढ कमी केली आहे. राज्य सरकार दरवाढ कमी करणार का? असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. त्याबाबत राज्य सरकारशी बोलावं लागेल. नागरिकांना दिलासा देण्याबाबत राज्य सरकारने सकारात्मकता दाखवली आहे. पण केंद्राकडे राज्याचं जीएसटीचं देणं आहे ते केंद्राने द्यावं. त्यामुळे लोकांना मदत करणारा निर्णय घेणं राज्य सरकारला शक्य होईल, असा टोला पवारांनी लगावला.

एसटी कर्मचाऱ्यांनो सहकार्य करा

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे लोक मला भेटले होते. त्यांनी संप पुढे न्यायचा नाही असं सांगितलं होतं. दिवाळीत नागरिकांना त्रास द्यायचा नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण काही लोकांनी टोकाची भूमिका घडल्याने हे घडतंय. 85 टक्के एसटी रस्त्यावर आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावं असं माझं आवाहन आहे. तसेच कोर्टानेही संप करण्यास मनाई केली आहे. कोर्टाच्या निर्णयाचं कर्मचाऱ्यांनी पालन करावं, असंही माझं मत आहे, असं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची दिवाळी तुरुंगात, आता मुलगा ऋषिकेशला ईडीचं समन्स, चौकशीचं शुक्लकाष्ठ संपेना!

PM Modi Kedarnath: केदारनाथाच्या चरणी मोदींचं नमन, शंकराचार्यांच्या पुतळ्याचं अनावरण

गोविंदबागेत पवारांचं फॅमिली डिनर; बारामतीमध्ये आज पॉवर शो, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवारांना भेटणार

(sharad pawar no reaction of ed and it department enquiry)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.