माझी निवडणूक बिनविरोध का नाही?, शिवाजीराव कार्डिलेंचा रोख कुणाकडे?

समोरच्या उमेदवाराला सूचक आणि अनुमोदक देखील नव्हता तरी देखील निवडणूक लावण्यात आल्याचं मत कार्डिले यांनी व्यक्त केलं आहे. Shivajirao Kardile district bank election

माझी निवडणूक बिनविरोध का नाही?, शिवाजीराव कार्डिलेंचा रोख कुणाकडे?
शिवाजीराव कार्डिले, आमदार, माजी मंत्री
Follow us
| Updated on: Feb 20, 2021 | 11:48 AM

अहमदनगर: अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला आज (20 फेब्रुवारी) सकाळपासून सुरुवात झालीये. जिल्हा बँकेत एकूण 21 जागा असून त्यापैकी 17 जागा बिनविरोध झाल्या आहेत. मात्र, माजी मंत्री शिवाजी कार्डिले यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये. कार्डिले यांची जागा बिनविरोध होऊ न शकल्याने त्यांना निवडणुकीला सामोरे जाव लागतंय. त्यामुळे महाविकास आघाडीचे मोठे आवाहन त्यांच्यासमोर असणार आहे. नगर तालुका विविध कार्यकारी सेवा संस्था गटात शिवाजीराव कर्डिले आणि सत्यभामाबाई बेरड यांच्यात लढत होणार आहे. तर, कार्डिले यांनी बिनविरोध न झाल्याने नाराजी व्यक्त केलीय. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी माझी इच्छा होतीय, मात्र जिल्ह्यातील काहींनी जाणून बुजून ही निवडणूक लावली असल्याचा आरोप शिवाजीराव कर्डीले यांनी केलाय. (Shivajirao Kardile said he will win district bank election with huge margin)

समोरच्या उमेदवाराला सूचक आणि अनुमोदक देखील नव्हता त्यामुळे ही निवडणूक जाणून-बुजून लागल्याचं मत कार्डिले यांनी व्यक्त केलं आहे. तर उद्या समोरच्या उमेदवाराचे डिपॉझिट जाईल आणि माझाच विजय नक्की होईल, असा विश्‍वास माजी आमदार शिवाजीराव कार्डिले यांनी व्यक्त केला आहे.

निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न

ज्या दिवशी जिल्हा बँकेची निवडणूक घोषित झाली त्यादिवशी शेतकऱ्याची बँक म्हणून माझी प्रामाणिक इच्छा होती की पक्ष पातळीवर राजकारण होऊ नये. ही निवडणूक बिनविरोध व्हावी त्यासाठी मी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील तसेच खासदार सुजय विखे पाटील यांना भेटून मी तसा प्रयत्न केला. मात्र, ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही, असं कार्डिले म्हणाले.

कार्डिले पत्रकार परिषद घेणार

माझ्यासाठी ही जागा कुठल्याही प्रकारे प्रतिष्ठेची नसून माझ्याकडे 102 ठराव आहेत. तर, अर्ज भरण्याच्या दिवशी देखील ते हजर होते. मात्र, जाणीवपूर्वक ही निवडणूक काही मंडळींनी लावली असा आरोप कर्डिले यांनी केलाय. तसेच माझं वर्चस्व जिल्ह्यातील काही दिग्गज मंडळींना मान्य नसतं त्यामुळे ही निवडणूक लागावी अशी त्यांची इच्छा असते, अस परखड मत त्यांनी व्यक्त केले. आता कार्डीले यांचा रोख नेमका कोणाकडे असा सवाल निर्माण झालाय. त्याचबरोबर कारखानदारांच्या निवडणुका त्यांनी बिनविरोध केल्या. मात्र, माझी निवडणूक बिनविरोध व्हायचा प्रयत्न व्हायला पाहिजे होता, ते झाले नाही. तसे प्रयत्न देखील या मंडळींनी केले नसल्याचं कार्डिले यांनी म्हटलं. माझी जागा बिनविरोध का झाली नाही याचा खुलासा उद्या मी पत्रकार परिषद घेऊन करेल. तसेच बिनविरोध न होण्यासाठी पक्षातले मंडळी नसून पक्षातील बाहेरचे काही मंडळी होते. त्यांनी हा प्रयत्न केल्याचे दिसते, तर विखे यांनी देखील प्रयत्न केला मात्र त्यांना देखील यश आले नाही असा मत त्यांनी व्यक्त केलाय.

4 जागांसाठी निवडणूक

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या 21 जागांपैकी 17 जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर उर्वरित चार जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये भाजपचे किंगमेकर नेते आणि माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीतील 17 बिनविरोध उमेदवार

1) आमदार मोनिका राजळे (पाथर्डी)

2) अण्णासाहेब म्हस्के (राहाता)

3) चंद्रशेखर घुले (शेवगाव)

4) राहुल जगताप (श्रीगोंदा)

5) अमोल राळेभात (जामखेड)

6) सीताराम गायकर (अकोले)

7) मंत्री शंकरराव गडाख (नेवासा)

8) अरुण तनपुरे (राहुरी)

9) माधवराव कानवडे (संगमनेर)

10) भानुदास मुरकुटे (श्रीरामपूर)

11) अनुराधा नागवडे (श्रीगोंदा)

12) आशा काकासाहेब तापकिर (कर्जत)

13) करण जयंत ससाणे (श्रीरामपूर)

14) आमदार आशुतोष काळे (कोपरगाव)

15) अमित अशोक भांगरे (अकोले)

16) गणपतराव सांगळे (संगमनेर)

17) विवेक कोल्हे (कोपरगाव)

या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 14 केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये 17 बूथ असून 1376 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या प्रक्रियेसाठी 85 अधिकारी-कर्मचाऱ्यांची, तसेच 34 पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या:

नगर जिल्हा सहकारी बँक : 17 जागा बिनविरोध, कर्डिलेंच्या जागेसाठी निवडणूक, भाजपच्या ‘किंगमेकर’ला धाकधूक

अहमदनगरमध्ये जिल्हा बँक निवडणुकीचा धुराळा, शिवाजी कर्डिलेंसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

(Shivajirao Kardile said he will win district bank election with huge margin)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.